Home Education #Maharashtra । शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी महा स्टूडेंट ॲपचा वापर, शिक्षण विभागाची...

#Maharashtra । शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी महा स्टूडेंट ॲपचा वापर, शिक्षण विभागाची डिजीटल शाळा

491

मुंबई ब्युरो : सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. MahaStudent ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती तात्काळ कळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजीटल शाळांची चळवळ

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजीटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ हा निर्देशांक विकसित केला असून यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पद्धतीने उपस्थिती यासाठी गुण देण्यात येणार आहेत. यादृष्टीने राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणालीमध्ये ही उपस्थिती नोंदविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

संबंधित ॲप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध

सदर ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यामध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच अनुपस्थिती डिजीटल पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. या ॲपमुळे विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही, असे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे कळवले आहे.

असे डाऊनलोड करा MahaStudent ॲप
  1. स्टेप 1 : महास्टुडंट अ‌ॅप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरला भेट द्या
  2. स्टेप 2 : गुगल प्ले स्टोअरवर MahaStudent सर्च करा
  3. स्टेप 3 : Install वर क्लिक करा

Uddhav Thackeray । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी, सकाळी झाले ऑपरेशन

Previous article#Bollywood | टाइगर श्रॉफ की सबसे ज्यादा 70 दिनों तक शूट होने वाली फिल्म है ‘गणपत’
Next article#Maharashtra । भाजपच्या माजी मंत्र्याकडून मंदिराच्या जमिनीचा घोटाळा, लवकरच पुरावे देणार : नवाब मलिक
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).