Home मराठी #Nagpur | स्वामीधामनगरी घोगली येथे आंबेडकर जयंती साजरी

#Nagpur | स्वामीधामनगरी घोगली येथे आंबेडकर जयंती साजरी

नागपूर ब्युरो: स्वामीधामनगरी घोगली येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आनंद आंबेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात महिला मंडळाच्यावतीने बुद्धवंदनेने करण्यात आली. आनंद आंबेकर आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या जीवनातील दोन प्रसंग सांगितले.बाबासाहेबांचे विचारच या देशाला तारू शकतात, असे म्हणत त्यांनी युवा पिढीला बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी प्रतिभा वारेकर यांनी रमाई व बाबासाहेब यांच्या जीवनातील एक मार्मिक व हृदयस्पर्शी प्रसंग एकपात्री अभिनयातून सादर केला. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष एस. आर. नेहारे यांनीदेखील अध्यक्षीय भाषणातून एक मार्मिक प्रसंग विदित केला.

यावेळी महाराष्ट्र शासनाचा “गुणवंत कामगार पुरस्कार” प्राप्त मधुकर सुरवाडे व राष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मुंबई तर्फे इंडियन एज्युकेशनल एक्सीलेन्सी अवॉर्ड २००४ प्राप्त शिक्षिका शुभांगिनी वासनिक यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात मुलांसाठी चित्रकला व वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. तसेच सर्वांना “राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य” हे पुस्तक भेट देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव राजेश सोनटक्के यांनी केले. संचालन मधुकर सुरवाडे यांनी केले. आभार भास्कर वासनिक यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शंकर खाडे, रमेश कदम, खडसे, अशोक सांगोळे, प्रकाश रामटेके, छगन बारहाते, शशी शेंडे, गवळी, प्रमोद रामटेके, हरीश भगत, मनोज फुलपाटील, अमोल पाटील, किशोर रिंगणे आदींनी परिश्रम घेतले.