Home Maharashtra #Maharashtra । भाजपच्या माजी मंत्र्याकडून मंदिराच्या जमिनीचा घोटाळा, लवकरच पुरावे देणार :...

#Maharashtra । भाजपच्या माजी मंत्र्याकडून मंदिराच्या जमिनीचा घोटाळा, लवकरच पुरावे देणार : नवाब मलिक

505
मुंबई ब्युरो : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डाशी संलग्नित ट्रस्टसंदर्भातील कारवाई, भाजपच्या माजी मंत्र्याचा घोटाळा आणि कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य, एसटी कर्मचारी संप यामुद्यावर भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराच्या जागेचा घोटाळा केला असून लवकरचं ते प्रकरण बाहेर काढणार आहे, असं नवाब मलिक म्हणालेत.

वक्फ बोर्डच्या कार्यालयात छापे टाकण्याचं सांगण्यात आलं आहे. माझं ईडीच्या लोकांना आवाहन आहे की अफवा पसरवण्याचं काम बंद करावं. पत्रकार परिषद आणि प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करुन भूमिका स्पष्ट करावी. सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवावी. काही बातम्या प्रसिद्ध करुन तुम्ही बदनामी करु शकत नाही. आपल्या वरिष्ठांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. पुण्यातील एंडोवमेंट ट्रस्टनं बनावट कागदपत्र दाखवत एमआयडीसीत जमीन घेतली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे. ईडीच्या एंन्ट्रीचं स्वागत आहे. वक्फ बोर्डात आम्ही क्लिनअप अभियान सुरु केलं, असं नवाब मलिक म्हणाले.

क्लिन अप अंतर्गत मंदिर, मस्जिद आणि दर्गाहच्या जमीन हडपली आहेत ते बाहेर काढणार आहे. भाजपच्या माजी मंत्र्यानं जमिनी हडप केल्या आहेत. ईश्वराच्या नावावर, अल्लाहच्या नावावर दिलेल्या जमिनी हडपण्यात आल्या. ती प्रकरणं बाहेर काढणार आहे. भाजपच्या माजी मंत्र्यानं कसे शेकडो कोटी हडपले ते बाहेर काढणार आहे. जे अधिकारी या भ्रमात आहेत की नवाब मलिक घाबरू शकतात मी त्यांना सांगू शकतो की मी या प्रकरणाच्या शेवटापर्यंत जाणार आहे, असं मलिक म्हणाले.

महिला अभिनेत्रीला केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. तिच्या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध करतो. 1857 ते 1947 लोकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान दिलं. त्या अभिनेत्रीच्या वक्तव्यानं लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान झाला आहे. महात्मा गांधीचा देखील अपमान करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं तात्काळ स्वरुपात कंगना रानौतचा पद्मश्री मागं घेऊन तिला तात्काळ अटक करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

#Bollywood | टाइगर श्रॉफ की सबसे ज्यादा 70 दिनों तक शूट होने वाली फिल्म है ‘गणपत’

Previous article#Maharashtra । शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी महा स्टूडेंट ॲपचा वापर, शिक्षण विभागाची डिजीटल शाळा
Next article@AnilDeshmukhNCP । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत 15 नोव्हेंबरपर्यंत वाढ
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).