Home Maharashtra Uddhav Thackeray । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी, सकाळी झाले ऑपरेशन

Uddhav Thackeray । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी, सकाळी झाले ऑपरेशन

478

मुंबई ब्युरो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सकाळी 7.30 वाजता एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू झाली. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. वरिष्ठ आँर्थो सर्जन डाँक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. सकाळी 08.45 वाजता डाँक्टरांनी ऑपरेशन यशस्वी झाली असल्याची माहिती दिली. तसेच यानंतर आता आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुढील आठवड्यात उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू होणार अशी माहितीही डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा मानेचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे बुधवारी (10 नोव्हेंबर) कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एका निवेदनातून माहिती, गेल्या दोन वर्षांत विषाणूविरूद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान, त्यांच्याकडे मान खाली घालण्यासही वेळ मिळाला नाही. ठाकरे म्हणाले, मला मानेचे दुखणे होते, पण त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे जे व्हायचे होते ते आता झाले. आता डॉक्टरांनी मला या दुखण्यावर योग्य उपचार करण्याचा सल्ला दिला आहे.

योग्य उपचारासाठी 3-4 दिवस त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, लसीकरण मोहिमेकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे. ते म्हणाले की, राज्याने 10 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे, परंतु सर्वांसाठी संपूर्ण लसीकरण अनिवार्य आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कृपया जवळच्या केंद्रात जा आणि तुमचा जीव वाचवण्यासाठी त्वरित लसीकरण करा. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मला खात्री आहे की मी लवकरच बरा होईन.

तसेच मुख्यमंत्री म्हणाले होते की, पाठ आणि मानदुखीच्या तक्रारीनंतर ते रोज व्यायाम करत आहेत. ठरलेल्या वेळी ते रोज काही वेळ ट्रेड मिलवर चालतात. दिवाळीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या निकटवर्तीयाने याचा उल्लेख केला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मानेचे आणि मणक्याचे दुखणे वाढतच गेले. नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी करून घेतली आणि चाचणीचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

#Investment | आज से आपको मिलेगा सबसे सेफ इन्वेस्टमेंट का नया ऑप्शन; क्या है आरबीआई की रिटेल डायरेक्ट स्कीम?

Previous article#Covid । कोरोनाच्या बूस्टर डोसची तयारी: सरकार 10 दिवसांमध्ये जारी करु शकते पॉलिसी
Next article@narendramodi | लॉन्च की आरबीआई की दो स्कीम, गवर्नमेंट सिक्योरिटीज में निवेश और शिकायतों का समाधान आसान
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).