Home हिंदी नागपुरातील आयटी कंपनीत अमेरिकी कंपनीची 750 कोटींची गुंतवणूक

नागपुरातील आयटी कंपनीत अमेरिकी कंपनीची 750 कोटींची गुंतवणूक

856
  • नागपूरचे आयटी तज्ञ विक्रम लाभे यांच्या भारतीय स्टार्टअप “फाईव्हट्रन” मध्ये 10 कोटी डॉलर्सची परकीय गुंतवणूक
  • अँडरसन हॉवर्डस नावाच्या मोठ्या अमेरिकी कंपनीने केली गुंतवणूक

नागपूर : कोरोना आणि त्यासोबत करण्यात आलेल्या अनेक महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. सध्या ढासळत्या अर्थव्यवस्थेची चर्चा सर्वत्रच होत असताना काही व्यवसाय मात्र कमालीचे भरभराटीला आले आहेत. नागपूरचे आयटी तज्ञ विक्रम लाभे यांच्या भारतीय स्टार्टअप आयटी कंपनी “फाईव्हट्रन”मध्ये लॉकडाउनच्या काळात तब्बल एक -दोन नव्हे तर 10 कोटी डॉलर्स म्हणजेच 750 कोटींची परकीय गुंतवणूक करण्यात आली आहे. अँडरसन हॉवर्डस नावाच्या मोठ्या अमेरिकी गुंतवणूक कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे अँडरसन हॉवर्डसने याच्या आधी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर आणि स्काइप सह इतर अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक केली आहे.


ये भी पढ़ें – 
नागरिकों की इच्छा पर निर्भर होगा नागपुर का जनता कर्फ्यू
अंकित गोयल गढचिरोली के नए एसपी, शैलेश बलकवडे का कोल्हापुर तबादला
कोविड- 19 : महाराष्ट्र के ऊर्जा मंत्री नितिन राऊत भी पॉजीटिव


मूळचे नागपूरकर आणि ग्रॅज्युएशन नंतर अनेक वर्षे कॅनडा आणि अमेरिकेत आयटी क्षेत्रात काम करणारे विक्रम लाभे सध्या बंगळुरूमध्ये आयटी क्षेत्रात काम करतात. भारतात आल्यानंतर त्यांनी फाईव्हट्रन नावाची स्टार्टअप कंपनी सुरु केली. या कंपनीने उभारणीच्या काही काळातच मोठी उंची गाठली आहे.

काय काम करते फाईव्हट्रन?
फाईव्हट्रन प्रामुख्याने त्यांच्या ग्राहकांसाठी ऑटोमेटेड डेटा इंटिग्रेशनचे काम करते. एका प्रकारे क्लाइंट्सला लागणारा मोठ्या प्रमाणावरील डेटा गोळा करून ते हव्या त्या स्वरूपात वर्गीकृत करून देण्याचे काम करते. सध्या विविध कंपन्या कोरोनामुळे कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे यावर भर देत आहे. त्यामुळेच ऑटोमेटेड डेटा इंटिग्रेशनचे काम करणाऱ्या फाईव्हट्रनसाठी कोरोना संकटकाळात ही नवी व्यावसायिक संधी निर्माण झाली आहे. क्लाइंट्सला लागणारा डेटा ऑनलाईन त्यांना उपलब्ध करून देण्याचे काम ते करत आहेत.

वैदर्भीय आणि महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारांच्या संधी
विक्रम लाभे यांनी भारतीय तरुणांना सोबत घेऊन काही तरी करण्याचं ठरवलं होतं. अमेरिकेतील आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांनी भारतात एका खोलीतून फाईव्हट्रन ही कंपनी सुरु केली. एका खोलीतून सुरु झालेली फाईव्हट्रन आज बंगळुरूमध्ये 1 हजार कर्मचाऱ्यांसह एका मोठ्या आयटी कंपनीपर्यंत पोहोचली आहे. बंगळुरू शिवाय हैदराबाद आणि मुंबईत कंपनीचे कार्यालय आहेत. लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना वाढीस लागल्याने फाईव्हट्रनला चांगले दिवस आले आहेत.

अँडरसन हॉवर्डसच्या 750 कोटींच्या गुंतवणुकीतून फाईव्हट्रन जागतिक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास विक्रम लाभे यांनी व्यक्त केला आहे. सध्या विक्रम लाभे नागपुरात असून इथूनच कंपनीचे काम सांभाळत आहेत. विशेष म्हणजे आजवर त्यांनी फाईव्हट्रनमध्ये वैदर्भीय आणि महाराष्ट्रातील तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. आता मोठ्या गुंतवणुकीनंतर कंपनीच्या विस्तारात पुन्हा वैदर्भीय आणि महाराष्ट्रातल्या आयटी इंजीनियर्स ला संधी देण्याचे त्यांनी ठरविले आहे.