Home Social #Nagpur | कर्मविर दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मदिनानिमित्य बुधवारी अनेक कार्यक्रम

#Nagpur | कर्मविर दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मदिनानिमित्य बुधवारी अनेक कार्यक्रम

विशेष बुद्धवंदना, धम्मदेशना तसेच मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

नागपूर ब्यूरो: कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या 99व्या जन्मदिनानिमित्य बुधवार दिनांक 23 मार्च 2022 रोजी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 वाजता पुत्यनिय भिक्षुसंघाच्या प्रमुख उपस्थितीत ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्धवंदना व धम्मदेशना घेण्यात येईल. ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते उपस्थित भिक्षु संघास चिवरदान व धम्मदान देण्यात येईल.
महाराष्ट्र कास्ट्राईबचे अध्यक्ष क्रिष्णा इंगळे यांनी कामगार व कर्मचाºयांना न्याय व हक्काकरीता अथक परिश्रम घेतले. दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून क्रिष्णा इंगळे यांचे शाल आणि स्मृतिचिन्ह देउन सत्कार करण्यात येईल.
दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत डॉ. महात्मे नेत्र हॉस्पीटल यांच्या नेत्र तज्ञ चमू द्वारे एक दिवसीय मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन कर्मवीर दादासाहेब कुंभारे परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, कामठी येथे करण्यात आले आहे.
दादासाहेब कुंभारे प्रशिक्षण केंद्र, कामठी येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय द्वारे संचालीत समर्थ प्रशिक्षण च्या दुसºया टप्प्याचे शुभारंभ करण्यात येत असून यामध्ये अनेक युवक-युवतींना प्रशिक्षण देउन स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करण्यात येईल.
वरील सर्व कार्यक्रमांंचे आयोजन ओगावा सोसायटी, कामठी, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेज, दादासाहेब कुंभारे परिसर कामठी, ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, कामठी द्वारे करण्यात येत आहे.

Previous article#Nagpur | व्यापक प्रतिसाद के साथ जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स के ग्रैंड एग्जीबिशन का समापन
Next articleMaharashtra । 2050 पर्यंत तापमान 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढण्याचा धोका, सोबत पावसाचे प्रमाणही वाढत जाणार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).