Home Social ९ मार्चपासून महिला दिनानिमित्त “स्नेहमिलन आणि प्रदर्शन”

९ मार्चपासून महिला दिनानिमित्त “स्नेहमिलन आणि प्रदर्शन”

रंगोत्सवमध्ये गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन: तीन दिवस प्रदर्शन व विक्री

नागपूर ब्युरो: आरोह संस्थेची वाटचाल, उभ्या राहिलेल्या अनेक प्रक्रिया, काही विशेष उपक्रम व त्यात मिळालेलं यश, प्रकल्पांचा सुरवतीपासूनचा प्रवास, त्यातून मिळालेले सुंदर अनुभव हे सर्व समाजघटकापर्यंत पोहचावेत, यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त “स्नेहमिलन आणि प्रदर्शन” आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आरोहच्या विश्वस्त विशाखा राव व शर्मिष्ठा गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. राणी लक्ष्मीबाई सभागृह, लक्ष्मीनगर, आठ रस्ता चौकाजवळ, नागपूर येथे दि.९,१० व ११ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

९ मार्च रोजी प्रसिद्ध योग व प्राणायाम शिक्षिका पद्मिनी जोग यांच्याहस्ते उदघाटन होईल. योगासने, प्राणायाम का करावे? कश्या पद्धतीने करावे याबद्दल पद्मिनी जोग मार्गदर्शन करतील.

दुसऱ्या दिवशी रविवार,दि.१० मार्च,२०२४ रोजी दुपारी १ ते ३ या दरम्यान गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “गर्भसंस्कार” या कार्यक्रमात गर्भवती महिलांसाठी व ज्यांची माता होण्याची इच्छा आहे, त्या स्त्रीवर्गासाठी गर्भसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये योगाचे महत्त्व याबद्दल पद्मिनी जोग मार्गदर्शन करतील. गरोदरपणातील आहार, विहार, सुविचार व गर्भावर होणारा त्याचा परिणाम याबद्दल विवेचन व मुख्य मार्गदर्शन श्रीमती नीलिमा पाठक करतील. डॉ.विशाखा जोगदंड (स्त्रीरोग तज्ञ) व श्रीमती अलका जोग ह्यांची विशेष उपस्थिती असेल. गर्भसंस्कार शिबिर विनामूल्य आहे. नोंदणी करणे आवश्यक आहे.

“रंगोत्सव”मध्ये ऑरगॅनिक होळी रंग, एप्रोंस, ब्लॉक प्रिंटेड स्टोल्स, स्कर्ट्स, कुशन कवर्स, बॅग, डायरी,फाईल्स, पेन स्टँड, वॉलेट्स, बेबी वेअर्स, मॅटरनिटी वेअर्स, फिडींग गाऊन, साडी कव्हर्स, कॉन्फरन्स फाईल्स इत्यादी वस्तु प्रदर्शनात राहणार आहेत.

सोमवार, दि.११ मार्च रोजी सी.एस.आर. पॅनलच्या प्रतिनिधींचे अनुभव कथन होणार आहे.

‘रंगरेषा’ ह्या ब्रँड निगडीत अनेक महिला पर्यावरणपूरक कापड़ी वस्तु तयार करीत आहेत, त्याचेही इथे तीन दिवस प्रदर्शन व विक्री राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी भेट देऊन महिलांचा उत्साह वाढविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आरोह संस्थेबद्दल
गरीब, आदिवासी महिलांची स्थिती, त्यांची होत असलेली आर्थिक कुचंबना बघून विशाखा राव – जठार व शर्मिष्ठा गांधी या दोन कार्पोरेट क्षेत्रात कार्य करणाऱ्या मैत्रिणींनी या महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे, या उद्देशाने आरोह संस्थेची स्थापना केली. २००४ साली स्थापन झालेल्या ‘आरोह’च्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, समुपदेशन देण्यासाठी व त्यांचे सक्षमीकरणाकरिता अनेक उपक्रम राबविण्यात आले. विदर्भातील २५००० हून अधिक महिलांच्या जीवनात आजपर्यंत आरोहने आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.

उपक्रम
२००७ सालापासून शाळकरी मुले आणि संस्थांसोबत पर्यावरण संरक्षण व संवर्धन क्षेत्रात कार्यरत. नागपुरातील ११ मनपा शाळांमध्ये आणि शंकरनगर येथील मूकबधिर विद्यालयात पोषण उद्यान विकसित व पर्यावरण शिक्षणाचे कार्य.

आयआयआयटीमध्ये 15000 झाडे लावून अर्बन फॉरेस्ट (नागरी वनीकरण) याचे काम चालू, नवजात अर्भक आणि मातांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा. महिला बचत गटाकरिता उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत (ईडीपी) प्रशिक्षण कार्यक्रम.

शाश्वत उपजीविका कार्यक्रमांतर्गत महिला कारागिरांना प्रशिक्षण व रंगरेषा उत्पादने विकसित.

महिलांसाठी विविध प्रकारचे शिवण कामावर आधारित प्रशिक्षण उदा. स्कूल यूनिफॉर्म, सिक्युरिटी यूनिफॉर्म, शर्ट-पैन्ट, बेबी वेयर इत्यादी.

महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी ‘रंगरेषा’, ‘वर्धिनी’, ‘आरण्यक’ आणि ‘भूसंपदा’ इत्यादी महिलांच्या उत्पादनाचा ब्रँडची सुरुवात.

१) २५,००० विदर्भातील महिलांना कौशल्य व सूक्ष्म उ‌द्योगचे प्रशिक्षण.
२) १०,००० शालेय विद्यार्थांना पर्यावरण प्रशिक्षण.
३) १५,००० स्थानिक वृक्ष लागवड व शहरात हरित वने उभारणे.

विनित
विशाखा राव व शर्मिष्ठा गांधी

विश्वस्त
डॉ.आशिष शहाणे, मिल्का ढोरे, निशिकांत जाधव, अलका जोग, प्रदीप गावंडे, श्रीकांत गाडगे.

स्वयंसेवक
नसरीन अंसारी, कीर्ती मंगरुळकर, अनुप कठाडे, दिपक शाहू, रमेश डेलीकर, ज्योती मुळे, शीतल येनूरकर, ममता रहांगडाले, शीतल पचारे, लता दांडगे, संदीप कारेकर, पल्लवी लुटे, अर्चना भोपे, अर्चना कारेकर, जयश्री चव्हाण, आर्या खानापूरकर, कल्पना टेंभुर्ण.

संस्थेचा पत्ता 
शिव कल्याण अपार्टमेंट्स, पहिला माळा, मेडप्लसच्यावर, रिंगरोड, प्रतापनगर चौक, नागपूर-४४० ०१५.
ईमेल: aroha.nagpur@gmail.com,
वेबसाइट: www.arohanagpur.org

 

Previous article#Nagpur | अखिल भारतीय पुलिस खेल महोत्सव 26 से नागपुर में, देशभर के खिलाड़ी दिखाएंगे दम
Next articleएकता कॉलोनी मस्जिद कमेटी ने किया प्यारे खान का सत्कार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).