Home Education राज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद, परीक्षाही ऑनलाईन होणार

राज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद, परीक्षाही ऑनलाईन होणार

407

राज्यातील वाढत्या कोरोना आणि नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहेत. तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. असेही सामंत यांनी सांगितले.

शाळा पुन्हा बंद…

नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबाद या शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तर नागपूर, पुणे आणि ठाणे आणि औरंगाबादेतील पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, या काळात, ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

Previous articleसंजय राऊतांच्या घरात कोरोनाची एंट्री:पत्नी, मुलीसह चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
Next articleआता लॉकडाऊन नाही । तातडीची बैठक : गर्दी थांबवणे हेच प्रमुख लक्ष्य- आरोग्यमंत्री टोपे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).