Home मराठी संजय राऊतांच्या घरात कोरोनाची एंट्री:पत्नी, मुलीसह चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

संजय राऊतांच्या घरात कोरोनाची एंट्री:पत्नी, मुलीसह चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

465

राज्यभरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील अनेक नेत्यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांच्या आई, पत्नी आणि मुलीसह चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

राऊत यांच्या आई, त्यांची पत्नी, मुलगी आणि पुतणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. घरातील सदस्यांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे होते. यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये हे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना सौम्य लक्षणे होते. यामुळे सध्या तरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान राज्यातील अनेकांना नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, के. सी. पाडवी आणि प्राजक्त तनपुरे तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचा देखील समावेश आहे. जवळपास 61 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Previous articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राकाँचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय
Next articleराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद, परीक्षाही ऑनलाईन होणार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).