Home Maharashtra #maharashtra । जलयुक्त शिवार प्रकरणाला ठाकरे सरकारची क्लीनचिट नाहीच! आता देण्यात आले...

#maharashtra । जलयुक्त शिवार प्रकरणाला ठाकरे सरकारची क्लीनचिट नाहीच! आता देण्यात आले स्पष्टीकरण

540
मुंबई ब्युरो : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘जलयुक्त शिवारा’ला ठाकरे सरकारकडून क्लीनचिट देण्यात आल्याचे वृत्त होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती. मात्र आता या प्रकरणाला सरकारने क्लीनचिट दिली नसल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे सरकारनेच याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
नेमके काय म्हटले सरकारने ?

याविषयी ठाकरे सरकारने स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, ‘काल दि. 27 ऑक्टोबर, 2021 रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची लोक लेखा समितीसमोर साक्ष होती. त्यावेळी सचिवांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे सदर बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. परंतु, CAG ने उपस्थित केलेल्या मुद्दयांवर सचिवांनी आपली साक्ष नोंदवलेली आहे व ही आकडेवारी योजनेची अमलबजाणी करणा-या यंत्रणेने स्वतः दिलेली आहे. या समितीचे अध्यक्ष भाजप आमदार सुधिर मुनगंटीवार आहेत.’

71% कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता

सरकारने म्हटले की, ‘या अभियानाची सविस्तर चौकशी करण्यासाठी शासनाने SIT नेमलेली होती. त्याप्रमाणे सुमारे 71% कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सदर SIT च्या अहवालाप्रमाणे शासनाने सर्व जिल्हाधिका-यांना चौकशीचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी SIT च्या निकषाप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेला नाही. ही सर्व चौकशी चालू असतांना शासनाने जलयुक्त शिवार अभियानाला क्लीनचिट देण्याचा प्रश्न येत नाही.’

काय म्हणाले होते फडणवीस?

जलयुक्त शिवार प्रकरणाला क्लिनचित दिल्याची माहिती समोर आली होती. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, ‘मला अतिशय आनंद झाला आहे. कारण ही जनतेची योजना आहे. जनतेने राबवलेली योजना आहे. सहा लाख कामे झाली आहेत. जलयुक्त शिवार योजनेमध्ये काही तक्रारी या नक्कीच असू शकतात. या संदर्भात मी न्यायालयात एक अहवाल दिलेला होता. त्यानुसारच हा अहवाल आला असावा. 600 वेगवेगळ्या तक्रारी यावेळी होत्या. त्याबाबत चौकशी होईल, असे मी स्वतः म्हणालो होतो. चुकीच्या गोष्टींची चौकशी झालीच पाहिजे. त्याला माझी काहीच हरकत नाही. मात्र 6 लाख कामांसाठी 600 कामांची चौकशी करण्यात आली. ही काही मोठी गोष्ट नाही. ती झाली नसती तर बरं झालं असतं. मात्र, 600 कामांसाठी ती योजनाच पूर्णपणे चुकीची होती, असे म्हणणे योग्य नाही.’

#AzadiKaAmritMahotsav | केंद्र सरकार का सभी मीडिया हाउस को निर्देश, ‘आजादी का अमृत महोत्सव’ का लोगो दिखाएं

Previous article#Diwali । राज्य सरकारकडून नियमावली जाहीर; ​​​​​दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन
Next article#Bollywood | ऋतिक रोशन ने पूरा किया ‘विक्रम वेधा’ का पहला एक्शन सीक्वेंस
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).