Home मराठी World Environment Day | पर्यावरण व निसर्ग संस्थेचा वेबिनार संपन्न

World Environment Day | पर्यावरण व निसर्ग संस्थेचा वेबिनार संपन्न

नागपूर ब्यूरो: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व कोरोना महामारीची शासकीय बंधने पाळून संस्थेचा छोटेखांनी वेबिनार आज निसर्गाच्या सानिद्यात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुखवक्ते म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूरचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी पर्यावरण व निसर्ग संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव खरड, मुंबई, इग्नू नागपूरचे प्रादेशिक संचालक डॉ. पी. शिवस्वरूप, खादी व ग्रामोद्योग आयोग ( केव्हीआयसी ), नागपूरचे निवृत्त संचालक राहुल गजभिये, नागपूरचे प्रसिद्ध आर्किटेक्ट अनिकेत ठाकूर, दामोदर कटरे, पुरुषोत्तम मानकर, आर्या ढेंगे, मृणाल सुरवाडे, सातारचे सुलेमान भिलवडे, कल्याणचे दुर्गा खरड, कासारे, सरपंच पिपळा – घोगली नरेश भोयर, सरपंच बेसा – बेलतरोडी सुरेंद्र बानाईत, सरपंच वेळा ( हरी ) सचिन इंगळे, भाजयुमो नागपूर तालुका अध्यक्ष हरीश कंगाली, अमरावतीचे नाना बोडाखे, न्याहाल, नाशिकचे खैरनार, चंद्रपूरचे राहुल बेले, अरुण पोहरे, अकोल्याचे दिनेश पोहरे, ब्रम्हपु्रीचे तिवाडे इत्यादी उपस्थित होते.
 जागतिक पर्यावरण दिन २०२१ चे घोषवाक्य परिसंस्था पुनरसंचयन  ( इकोसिस्टिम रिस्टोरेशन ) याला अनुसरून करे म्हणाले, दिवसेंदिवस पर्यावरण व निसर्गाचा मानवाकडून होणारा ऱ्हास व हानी भरून काढण्यासाठी जगभर प्रयत्न सुरु आहेत आणि हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे याचा विसर न पडता आपले योगदान देण्याची आज गरज आहे.
डॉ. पी. शिवस्वरूप म्हणाले,  इगनूमध्ये पर्यावरण व निसर्गावर आधारित, शेतीविषयक बरेच अभ्यासक्रम आहेत, त्यांचे संस्थेच्या माध्यमातून गावागावात जनजागृती व्हायला पाहिजे. त्याकरिता आमचे नेहमी सहकार्य राहील.
संस्थेचे अध्यक्ष खरड म्हणाले, मुंबई – कोकण – उरण या किनारपट्टीवर आम्ही पर्यावरण रक्षणार्थ बरेच कामं केली आहेत आणि यापुढेही संस्थेच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून संपूर्ण राज्यात स्वच्छता मोहीम व पर्यावरणपूरक प्रकल्प राबविणार.
केव्हीआयसीचे गजभिये म्हणाले, खादी व ग्रामोद्योगातून संस्थेच्या सहयोगाने रोजगाराभिमुख प्रकल्प, योजना राबविता येतात. त्याकरिता आम्ही मार्गदर्शन करू.
यावेळी वेबिनारमध्ये सहभागी झालेल्यांनी पर्यावरणाच्या रक्षणार्थ आपली मते मांडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सचिव मधुकर सुरवाडे यांनी २०१३ पासून आजतगायत संस्थेने केलेल्या कामाची माहिती दिली तसेच या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आभार संस्थेचे कोषाध्यक्ष राजेश सोनटक्के यांनी मानले.
Previous articleAward | विशाल खर्चवाल राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार से सम्मानित
Next articleसंतरा नगरी पहुंचे बॉलीवुड के ‘मुन्नाभाई’
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).