Home Education Gadchiroli | समाज विकासाचे ध्येय ठेवून परिचारिकांनी कार्य करावे -न्यायमूर्ती भडके

Gadchiroli | समाज विकासाचे ध्येय ठेवून परिचारिकांनी कार्य करावे -न्यायमूर्ती भडके

गडचिरोली ब्युरो : मानवी जीवनात नर्सेस चे (परिचारिका) महत्व मागील वर्षी झालेल्या कोरोना प्रादुर्भावाने अधोरेखित केले आहे. कोरोना ग्रस्तांच्या जवळ कोणतेही आप्तस्वकीय जात नाहीत फक्त परिचारिका त्यांची सेवा करीत होत्या. एकंदरीत ज्यांच्यासाठी आपण आपलं आयुष्य वेचत असतो परंतु दुःखाच्या प्रसंगात ते कोणीही साथ देत नाहीत. मात्र कुठलीही अपेक्षा न बाळगता परिचारिका आपली सेवा करतात हेच खरे परमेश्वराचे स्वरूप असून मानव जातीच्या आरोग्य कल्याणासाठी नर्स ही पाठीच्या कण्या प्रमाणे आहे. त्यामुळे नर्सेस नी समाज विकासाचे ध्येय ठेवून कार्य करावे असे आवाहन देसाईगंज चे न्यायमूर्ती आनंद भडके यांनी केले.

न्यायमूर्ती आनंद भडके यांनी डॉक्टर साळवे नर्सिंग कॉलेज चातगावला आकस्मिक भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींची संवाद साधताना ते बोलत होते. न्यायमूर्ती आनंद भडके यांनी डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमधील शिक्षण, सोयी -सुविधांबाबत माहिती घेतली. संपूर्ण संस्थेची पाहणी केल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त करून दुर्गम भागात असलेल्या या शिक्षण संस्थे विषयी कौतुक व्यक्त केले. याप्रसंगी देसाईगंज चे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, एड. संजय गुरु, डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे संचालक डॉ. प्रमोद साळवे उपस्थित होते.

याप्रसंगी न्यायमूर्ती आनंद भडके यांचे स्वागत स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष अबोली त्रिसुले यांनी केले. यावेळी बोलताना जेसा मोटवानी म्हणाले की डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी कुठेही न घाबरता सतत आपली सेवा दिली. एवढेच नाही तर “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” कार्यक्रमांतर्गत गडचिरोली नगर परिषदेतर्फे संपूर्ण सर्वेक्षण या विद्यार्थिनींनी केले. हे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रमोद साळवे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here