Home मराठी Maharashtra | धनगर समाज बांधव यंदाही घरकूल योजनेच्या लाभापासून वंचित राहणार

Maharashtra | धनगर समाज बांधव यंदाही घरकूल योजनेच्या लाभापासून वंचित राहणार

नागपूरचे विभागीय आयुूक्त डाॅ. संजिव कुमार यांना निवेदन देतांना धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. बाबा टेकाडे सह महासंघाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेश चिंटणीस युवराज घोडे दिसत आहे.
  • धनगर समाजाच्या योजनेसाठी शासनाच्या तिजोरीत ठणठणाट
  • शासन आणि प्रशासना कडून दिशाभुल
  • निवेदनाला केराची टोपली
  • नेत्यांची आश्वसाने फोल ठरली
नागपूर ब्युरो : सतत दोन वर्षापासून धनगर समाज बांधव एनटीसी घरकूल योजनेचा पाठपुरावा करीत आहे. मागील वर्षी ही योजना वाऱ्यावरच राहीली. यंदा गोरगरीब धनगर बांधवाना घरकूल योजनेचा लाभ मिळेल अशी आशा होती मात्र त्यांच्या सपनांवर पाणी फेरले. आर्थीक वर्ष संपत आहे, अद्यापही त्याचे अर्ज मंजूर झाले नाहीत म्हणजे यंदाही धनगर बांधव घरकूल योजने पासून वंचित राहणार असे चित्र स्पष्ट झाले.

महाराष्ट्र शासनाने 6 सप्टेबर 2019 रोजी धनगर समाज बांधवासाठी (एनटीसी) घरकूल योजनेचा अध्यादेश काढला गोरगरीब धनगर बांधवाचा हक्काच चांगल घर मिळाव असा योजनेचा उद्देश होता. या अध्यादेशाला तब्बल दोन वर्ष घेऊनही योजनेची अमलबजावनी झाली नाही. तथा धनगर बांधव उपरोक्त योजनेच्या लाभापासून वंचित राहीले.

शासनाने नागपूर जिल्हासाठी घरकूल योजने अंतर्गत एक हजार घरांचे टार्गेट दिले होते. प्रचार आणि प्रसाराच्या अभावामुळे जिल्हातील विविध तालुक्यातून फक्त 961 अर्ज (प्रस्ताव) सादर झाले. हे अर्ज सबंधीत विभागत कित्तेक महिने धुळखात पडले राहीले. यानंतर अर्जात क्षुल्लक त्रृटया काढल्या. सादर 961 अर्जा पैकी पहील्यांदा 644 अर्ज अपात्र ठरवले तर 317 अर्जाना मंजूरी दिली होती. परंतु यानंतर फक्त 28 अर्जच पात्र आहेत असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनाही योजनेच्या लाभ मिळाला नाही. धनगर बांधवाचे घरकूल योजनेचे अर्ज समाज कल्याण आणि जिल्हा ग्रामिण विकास योजना कार्यालयाच्या गोत्यात अडकून राहीले. दोन्ही कार्यालयांना अर्जाची दखल घेण्यास सवडच मिळाली नाही. यात मात्र धनगर बांधवाच्या स्वप्नाचा चुराडा झाला.

अपुर्ण त्रृटयाचे अर्ज स्विकारले कसे ?

विविध तालुक्यातील गावाखेडयाच्या गोरगरीब धनगर बांधवांनी आटापीटा करुन तातडीने घरकूल योजनेचे अर्ज सादर केले संबंधीत कर्मचाऱ्यांना दिलेल्या माहिती नुसार हे अर्ज परीपुर्ण होते. अर्जात त्रृटया होत्या तर त्रृटयाचे अर्ज का स्विकारण्यात आले. त्यावेळी त्रृटयांची पुर्तता का करण्यात आली नाही. पंचायत समिती स्तरावरच अर्जाची छाणनी का केली नाही. मग त्रृटयाचे अर्ज एवढे महिने का पडून राहीले. असे नानाविध प्रश्न उद्भवतात. यावरुन एकूणच धनगर समाजाच्या घरकूल योजने कडे शासनाचे व प्रशासनाचे सु़द्धा दुर्लक्ष झाले. धनगर बांधवांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी असी मागणी धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष तथा नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे यांनी केली.

विभागीय आयुक्तांना शिष्टमंडळ भेटले

धनगर समाज बांधवाना घरकूल योजने पासून वंचित ठेवले. यासाठी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी. गोरगरीब धनगरानां उपरोक्त योजनेचा लाभ द्यावा आदि मागणी एका निवेदना द्वारे नागपूरचे विभागीय आयुक्त डाॅ. संजीव कुमार यांना केली. तद्वत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओबीसी, एन टी, इतर अल्प संख्याक मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे, यांनाही निवेदन देण्यात आले.

धनगर समाजाच्या योजनेसाठी शासनाच्या तिजोरीत ठणठणाट

शासनाने धनगर समाज बांधवा साठी घरकूल योजनेचा अध्यादेश काढला आणि धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसली. वास्तविक योजनेच्या अमलबजावनीस योग्य निधीची पूर्तता केली नाही. या बाबत योजने करीता निधीच नाही तर अर्ज मंजूर करुन काय उपयोग असे एका अधिकाऱ्याने चक्क धनगर समांजाच्या शिष्टमंडळा समक्ष सांगितले. मग शासनाने योजने साठी निधी उपलब्ध करुन दिला नाही तर ही योजना कशी राबवली जाणार असा यक्ष प्रश्न निर्माण होतो. यावरुन धनगर समाजाच्या योजनेसाठी शासनाच्या तिजोरीत ठणठणाट दिसून येते. या बदल धनगर समाज आक्रोश व्यक्त करीत आहे. आता नाईलाजास्तव घरकुल योजन बाबत टप्या टप्यानेे तिव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेणार आहे.

एप्रिल महिन्यांत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिबिर घेणार

या संदर्भात समाज कल्याण कार्यालय नागपूरचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांना विचारणा केली असता धनगर समाज बांधवाच्या घरकूल योजनेचे नागपूर जिल्हयातून 961 प्रस्ताव आले होते त्या पैकी 28 प्रस्ताव पात्र आहेत. आता येत्या एप्रिल महिण्याच्या पहिल्या आठवडयात तालुका स्तरावरच शिबिर घेऊन अर्जाची छाननी करण्यात येईल तथा त्याच ठिकाणी अर्जाला मंजुरी दिली जाईल. या कामात धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here