नागपूर ब्युरो : आजच्या डिजिटल युगात सोशल मिडिया हे एक प्रभावशाली माध्यम बनले आहे. मात्र, त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जाऊन अफवा पसरवणे, हिंसाचाराला चिथावणी देणे, गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देणे व राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होणे असे प्रकार घडत आहेत. यावर उपाययोजना म्हणून नागपूर शहर पोलिसांनी सायबरहॅक इव्हेंट 2025 अंतर्गत एक नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक ‘गरुड दृष्टि’ हे सोशल मिडिया मॉनिटरिंग व इंटेलिजन्स टूल विकसित केले आहे. बुधवारी, 27 मे रोजी शहर पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते हे टूल नागपूर शहर पोलीस विभागात औपचारिकरित्या तैनात करण्यात आले असून, सायबर लॅब चाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी डीसीपी लोहित मतानी सह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





















