Home Maharashtra Nagpur । राकाँ कार्यकर्त्यांचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन

Nagpur । राकाँ कार्यकर्त्यांचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन

नागपूर ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील धरमपेठ परिसरातील निवासस्थानाजवळ आंदोलन केले. आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील धरमपेठ परिसरातील निवासस्थानाजवळ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा सुद्धा जाळला.

निमगडे हत्या प्रकरणावरुन राष्ट्रवादी आक्रमक

6 सप्टेंबर 2016 रोजी नागपुरात घडलेल्या एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात भाजपच्या काही लोकांचा हात आहे असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करीत आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ मोर्चाच्या स्वरूपात आले. सुमारे पंचवीस कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न सुरू केला. एकनाथ निमगडे हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत होतं मात्र काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी या प्रकरणात नागपूरच्या कुख्यात गुंड रणजीत सफेलकर आणि त्याचा सहकारी कालू हाटे आणि त्यांच्या गुंडांचा हात असल्याचा उलगडा केला होता. या प्रकरणात 11 आरोपी बनविण्यात आले असून त्यापैकी तीन ते चार जणांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here