सांगली ब्युरो : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ‘सध्या जो काही तपास सुरू आहे, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी
कुठेतरी विषय असल्याचे परमवीर सिंगच्या पत्रावरून जाणवतंय. पत्रात कुणाची सहानुभूती घेत हे पत्र लिहलं आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी कडक धोरण घेतल्यानंतर हे पत्र समोर आले. त्यामुळे या पत्राबाबत अनेक शंका आहेत’ असे वक्तव्य राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी केले.
मुंबई स्फोटकांनी भरलेली कार सापडली आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृत्यू झालाय या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे देण्यात आला आहे. सध्याचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे तो योग्य पद्धतीने तपास चालू आहे. पण हा सगळा जो प्रकार आहे. त्यावरून लक्ष हटवण्याचा कुठेतरी विषय असल्याचे आजच्या परमवीर सिंगच्या पत्रावरून जाणवतंय. पत्रात कुणाची सहानुभूती हे पत्र लिहले आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी कडक धोरण घेतल्यानंतर हे पत्र समोर आले. त्यामुळे या पत्राबाबत अनेक शंका आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी केलं.
‘या परिस्थितीमध्ये सुद्धा सरकार खंबीर आहे. कोणतीही अडचण सरकारला येणार नाही. योग्य तो तपास केला जाईल, असंही जयंत पाटील म्हणाले. मुंबईतील मायकल रोडवर ठेवलेली वाहन आणि मनसुख हिरेन यांचा खून कितीही मोठा अधिकारी असला तरी त्या आरोपीला हुडकून काढला पाहिजे. अधिकाऱ्यांनी स्वतःचे काम व्यवस्थित करायचे असते. काही अधिकारी असतात. पण राज्याचे विरोधी पक्ष नेते अविर्भाव आणतात तशी परिस्थिती नाही. राज्याचे पोलीस दल सक्षम आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला
गृहमंत्री यांच्या राजीनामा विरोधक मागताय पण विरोधकांचे काम काय आहे, ते करणारच, चौकशीतून सत्य बाहेर आल्यानंतर पुढे कारवाई केली जाईल, असं जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे कडक धोरण स्वीकारले आणि त्याच्या मुळात जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आलेली प्रतिक्रिया आहे. त्याला किती महत्व द्यायचे हे ठरवले पाहिजे, असेही पाटील म्हणाले.