Home Maharashtra Big Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रात लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य

Big Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रात लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य

महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरात 15 ते 21 मार्च 2021१ पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात अंमलात असेल. याचदरम्यान येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


मुंबई ब्युरो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

राज्यात लसीकरण वेगाने वाढवलं जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावं लागेल. जिथे आवश्यक आहे तिथे कडक लॉकडाऊन करावं लागेल. नागरिकांना विनंती आहे की लसीकरण करुन घ्या. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळा आणि मास्क वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस

उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाची लस घेतली. लस घेतल्यानंतर बोलताना त्यांनी म्हटलं की, लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. मी स्वत: लस घेतली आहे आता जनतेनेही घ्यावी, असं मी सर्वांना आवाहन करतो. उद्धव ठाकरे यांनी भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here