Home Nagpur #Nagpur | ट्राफिक चिल्ड्रेन पार्क धरमपेठ येथे ऑटो रिक्शा चालक व संघटनांची...

#Nagpur | ट्राफिक चिल्ड्रेन पार्क धरमपेठ येथे ऑटो रिक्शा चालक व संघटनांची कार्यशाळा

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नागपूर ब्युरो: ट्राफिक चिल्ड्रेन पार्क धरमपेठ येथे पोलीस उप आयुक्त वाहतुक लोहीत मतानी यांच्या अध्यक्षतेत व सहा पोलीस आयुक्त श्रीमती माधुरी बाविस्कर यांच्या उपस्थितीत ऑटो रिक्शा चालक व संघटनांची कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेला वाहतुक विभागावे पोलीस निरीक्षक. श्री.कदम, पुरी, मिराशे, खांदाळे, पोरे, पांडे, वासेकर, मोहनकर तसेव पोलीस निरीक्षक. श्रीमती देशमुख हे उपस्थित होते.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

सदर कार्यशाळेमध्ये ऑटो रिक्शा चालक यांच्या अडचणी समजुन घेवून त्यांना नियम पाळण्याबाबत तसेच युनिफॉर्म धारण करण्याबाबत समजविण्यात आले. स्पर्धेच्या युगात इतर ई-रिक्शा व कॅब यांच्या तुलनेत योग्य सेवा देवून प्रतिमा सुधारूण योग्य मार्गाने व्यवसाय वाढविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस उप आयुक्त, वाहतुक लोहीत मतानी यांनी ऑटो चालक व ऑटो संघटनांचे म्हणने समजून घेवून त्यांच्या अडचणी दूर करण्याबाबत आश्वासन दिले तसेच लगेच वाहतुक विभागातील सर्व पोलीस निरीक्षक यांची मिटिंग घेवून त्यांना शिस्तबद्ध ऑटोरिक्शा परिवहन ठेवण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमात वाहतुक नियमांविषयी रस्ता सुरक्षा दलाचे अतुल आगरकर यांनी मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे संचलन केले.