Home Education दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइन व वेळापत्रकनुसारच घेण्यावर शिक्षण विभाग ठाम

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइन व वेळापत्रकनुसारच घेण्यावर शिक्षण विभाग ठाम

मुंबई ब्युरो : गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी बारावी बोर्ड परिक्षेबाबत पालक संघटना, शिक्षक, बोर्डाचे आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये शिक्षणमंत्र्यांनी बोर्ड परिक्षेबाबत पालक, शिक्षकांचे म्हणणे जाणून घेतले. शिवाय, विविध विषय आणि बोर्ड परीक्षा आयोजनाबाबत चर्चा केली. यामध्ये पालकांनी परीक्षा ऑनलाइन घेता येईल का ? हा प्रश्न उपस्थित केला असता परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून, गावखेड्यात कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे व लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे यामध्ये शक्य नसल्याचा शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

शिवाय, सर्व विद्यार्थ्यांचा विचार करता बोर्डाला एकाच निर्णय घ्यावा लागणार त्यामुळे परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्याव्या लागणार आहेत, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठकीत पालकांना समजून सांगितले.

दहावी बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करणे शक्य नाही. कारण वेळापत्रकबाबत आपण हरकती आणि प्रश्न उपस्थित करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर सर्व बाजूने विचार करून हे वेळापत्रक तयार केले आहे. यामध्ये महत्वाच्या 2 विषयामध्ये गॅप देण्याचा प्रयत्न केला आहे. समजा, काही विद्यार्थी अडचणीमुळे किंवा कोव्हिडमुळे परीक्षा देऊ शकले नाही. तर लगेच आपण त्यांची परीक्षा घेणार आहोत. ही परीक्षा झाल्यावर लगेच पुढील परीक्षा घेण्याचे नियोजन करणार आहोत त्यामुळे विद्यार्थी पालकांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

जे विद्यार्थी कोरोनाच्या काळात शहर,गाव सोडून गेले त्यांना पुन्हा एकदा त्या शहरात गावात यायला पुरेसा वेळ आहे. शिवाय जे हॉस्टेलमध्ये विद्यार्थी राहत होते त्यांच्यासाठी परीक्षा देणे सुलभ व्हावे यासाठी SOP तयार करण्याचें काम सुरू आहे. प्रात्यक्षिक , तोंडी परीक्षा ज्या पुढच्या महिन्यात घेणार आहोत त्याबाबत विचार सुरू आहे. कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहचणार नाही याची खबरदारी घेऊनच शिक्षण विभाग प्रत्येक गोष्टीत विचार करत आहे. प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा कोरोना प्रादुर्भाव पाहता लेखी परीक्षानंतर घेता येईल का ? हा सुद्धा विचार शिक्षण विभाग करत आहे.

परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रममध्ये बद्दल ऐनवेळी होणे शक्य नाही. त्यामुळे ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचा सध्यातरी विचार बोर्डाने केला आहे. परीक्षा आयोजन आणि नियोजनाबाबत सल्लागार समिती विचार करून परिस्थितीचा विचार करून निर्णय घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here