Home कोरोना Nagpur । येत्या 15 ते 21मार्च दरम्यान नागपूर शहरात कडक लॉकडाऊन...

Nagpur । येत्या 15 ते 21मार्च दरम्यान नागपूर शहरात कडक लॉकडाऊन लावणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

1077

नागपुरात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर पालकमंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक

नागपूर ब्युरो : येत्या 15 ते 21मार्च दरम्यान नागपूर शहरात कडक लॉकडाऊन लावणार अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्नांची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. बुधवारी जिल्ह्यात 1710 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यानंतर प्रशासनाने कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला गांभीर्याने घेतले आहे. गुरुवारला याच विषयावर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वाची बैठक घेतली.

नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्र्यांची ही महत्वपूर्ण बैठक सुरूच होती. हाती आलेल्या माहितीनुसार पालकमंत्र्यांनी या बैठकीत कोरोना ची रुग्ण संख्या नागपूर जिल्ह्यात सातत्याने वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली व सध्या लागू असलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन, महानगर पालिका प्रशासन व पोलिसांना दिले आहे.

नागपूर शहरात संचार बंदी

या बैठकी नंतर पत्रकारांशी बोलतांना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले कि नागपूर शहरात दिनाक १५ ते २१ मार्च पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे, हा लॉकडाऊन नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात राहील, या दरम्यान सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहील. नागपूर शहरात संचार बंदी लावण्यात येईल. सर्व नागरिकांनी कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी सहकार्य करावे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहनही नितीन राऊत यांनी केलं आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे.

लॉकडाऊन दरम्यान काय सुरु राहणार?

नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत हे लॉकडाऊन लावले जाणार आहे. 15 ते 21 मार्च दरम्यान कडक संचारबंदी असणार आहे. नागपूर पोलिसांना कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं. या काळात उद्योग सुरू राहतील. सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थिती मध्ये सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा देखील सुरू राहतील. भाजी, दूध, दवाखाने, बँक, मीडिया या सेवा देखील सुरु राहतील.

लॉकडाऊन दरम्यान काय बंद राहणार?

लॉकडाऊन केलेल्या क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहणार आहेत. दारूची दुकाने बंद राहतील. मात्र दारूची ऑनलाईल घरपोच सेवा सुरू राहणार आहे.

वर्षभरापूर्वी आजच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं की, एक वर्षांपूर्वी आजच नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्णाला आढळला होता. तेव्हापासून आजवर नागपुरात एक लाखाहून अधिक नागरिकांना कोरनाची लागण झाली आहे. तर 4 हजार 215 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मध्यंतरी कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली होती, मात्र आता पुन्हा रुग्ण वाढत आहेत. आज आम्ही प्रशासनासोबत बैठक घेतली. नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहेत. तर काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण बाहेर फिरत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. काही ठिकाणी आयसोलेशनच्या नियमांचा उल्लंघन केलं जात आहे. या सर्व गोष्टींमुळे कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागपुरात लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.

नागपूर शहरातील कोरोना रुग्ण आणि जिल्ह्यातील मृत्यू
  1.   1 मार्च    877 रुग्ण     06 मृत्यू
  2.   2 मार्च    995 रुग्ण     10 मृत्यू
  3.   3 मार्च    1152 रुग्ण   06 मृत्यू
  4.   4 मार्च    1070 रुग्ण   08 मृत्यू
  5.   5 मार्च    1393 रुग्ण   09 मृत्यू
  6.   6 मार्च    1183 रुग्ण   09 मृत्यू
  7.   7 मार्च    1271 रुग्ण   07 मृत्यू
  8.   8 मार्च    1038 रुग्ण   11 मृत्यू
  9.   9 मार्च    1049 रुग्ण   06 मृत्यू
  10. 10 मार्च  1433 रुग्ण   08 मृत्यू
Previous articleRahul Gandhi | शब्द पाळला, तामिळनाडूतील 12 वर्षाच्या मुलाला शूज पाठवले
Next articleBig Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रात लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).