Home National Rahul Gandhi | शब्द पाळला, तामिळनाडूतील 12 वर्षाच्या मुलाला शूज पाठवले

Rahul Gandhi | शब्द पाळला, तामिळनाडूतील 12 वर्षाच्या मुलाला शूज पाठवले

नवी दिल्ली ब्युरो : काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून राजकारणाव्यतिरिक्तही इतर गोष्टींमुळे चर्चेत आहेत. आता तामिळनाडूतील एका मुलाला रनिंगसाठी शूज पाठवल्यामुळे राहुल गांधी चर्चेत आले आहेत. या मुलाला रनिंगच्या ट्रेनिंगसाठी शूज नव्हते, याची माहिती मिळताच राहुल गांधींनी त्याला एक जोडी शूज पाठवले आहेत. तामिळनाडू युवा काँग्रेसने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

अँटनी फेलिक्स असं या धावपटू मुलाचं नाव आहे. अँटनी 100 मीटर रनिंगचा सराव करतो. पण त्याच्याकडे चांगले शूज नव्हते. तमिळनाडू दौऱ्यात राहुल गांधी यांनी या मुलाची भेट घेतली. माझ्यापेक्षा वेगाने धावता येईल का? असं राहुल गांधींनी त्याला विचारले होते. त्यावर अँटनीने दिलेल्या उत्तरावर खूश होऊन राहुल गांधींनी त्याला शूज पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. तेच आश्वासन राहुल गांधी यांनी आता पूर्ण केलं आहे. राहुल गांधी यांनी पाठवलेले शूजदेखील चांगल्या क्वालिटीचे आहेत.

याबाबत तामिळनाडू युवा कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्वीट केलं आहे. “राहुल गांधींनी फेलिक्सला धावताना पाहिलं होतं आणि त्याला शूज पाठवण्याचा शब्द दिला होता. आमच्या नेत्याने या मुलाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे”, असं ट्विट तामिळनाडू युवा काँग्रेसने केलं आहे.

राहुल गांधी 1 मार्च रोजी तमिळनाडूमध्ये प्रचारादरम्यान कन्याकुमारीहून तिरुवनंतपुरमकडे जात होते. शेकडो लोक रस्त्यावर उभे होते. वाटेत राहुल गांधी चहाच्या दुकानात थांबले होते. याठिकाणी त्यांची अँटोनी फेलिक्स नावाच्या 12 वर्षाच्या मुलासोबत भेट झाली. फेलिक्स राहुल गांधींना भेटला त्यावेळी अनवाणी होता. फेलिक्ससोबत बोलल्यानंतर तो धावपटू असल्याचं राहुल गांधींना समजलं. यावर राहुल गांधींनी त्याला विचारले की माझ्यापेक्षा वेगाने धावू शकतो का? त्यावर फेलिक्सने लगेच उत्तर दिलं की,”हो, मी तुमच्यापेक्षा वेगाने धावू शकतो.” फेलिक्सच्या उत्तराने राहुल गांधी खूपच खूश झाले. त्यांनी त्याच्या शूजची साईज विचारली आणि एक जोडी शूज पाठवण्याचा शब्द दिला. आता फेलिक्सला राहुल गांधींनी पाठवलेले शूज मिळाले आहेत.

बुटाची किंमत किती आहे?

राहुल गांधींनी अँटनी फेलिक्सला पाठवलेला बुट ASICS या कंपनीचा आहे. फेलिक्सला मिळालेल्या शूजची किंमत ऑनलाईन 5499 रुपये आहे.

Previous articleमहावितरण ही जनतेची कंपनी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी थकबाकी भरा : उर्जामंत्री नितीन राऊत
Next articleNagpur । येत्या 15 ते 21मार्च दरम्यान नागपूर शहरात कडक लॉकडाऊन लावणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).