आज महाशिवरात्री. भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. आज देशासह राज्यभरात महाशिवरात्री निमित्त शिवमंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोनामुळं भक्तांची गर्दी मात्र नाही.
235 वर्षात पहिल्यांदाच महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिराच्या आतील गर्भगृहात सजावट आणि विद्युत रोषणाईनं परिसर उजळला आहे. मंदिराच्या आतील गर्भगृहात सजावट करण्यात आली आहे आणि विद्युत रोषणाईनं परिसर उजळला आहे.
इतिहासात पहिल्यांदाच भक्तांविना औंढ्यात महाशिवरात्री उत्सव
बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे आणि महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सव इतिहासात पहिल्यांदाच भक्तां विना होतोय. औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सव देशभरात परिचित आहे. दरवर्षी महाशिवरात्री ला मंदिर परिसरामध्ये नागनाथाची रथामध्ये परिक्रमा करण्यात येते. त्याला देशभरातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रात्री साडेबारा वाजता आमदार संतोष बांगर, तहसीलदार कृष्णा कानगुले, विस्वस्थ ऍड. राजेश पतंगे या तिघांनीही सपत्नीक महापुजा याठिकाणी केली. त्यानंतर परत मंदिर बंद करण्यात आले आहे. मंदिर परिसरात ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेत लावले आहेत.औंढा शहरातही सर्वत्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ज्यामुळे दरवर्षी ज्या औंढ्यात आजच्या दिवशी पाय ठेवायला जागा नसते तिथं शुकशुकाट पाहायला मिळत आहे.