Home Beauty Beauty । पीएसआय पल्लवी जाधव ‘ग्लॅमऑन मिस इंडिया’ स्पर्धेच्या फर्स्ट रनर अप

Beauty । पीएसआय पल्लवी जाधव ‘ग्लॅमऑन मिस इंडिया’ स्पर्धेच्या फर्स्ट रनर अप

जालना दामिनी पोलीस पथकातील प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव या ‘ग्लॅमऑन मिस इंडिया’ स्पर्धा 2020 च्या फर्स्ट रनर अप ठरल्या आहेत. याशिवाय ‘मिस फोटोजेनिक’ हा किताबही त्यांनाच मिळाला आहे.

जयपूरमध्ये आयोजित या स्पर्धेत देशभरातून 70 पेक्षा अधिक महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. यात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या पीएसआय पल्लवी जाधव यांना फस्ट रनर अप घोषित करण्यात आलं. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

पीएसआय पल्लवी जाधव गेल्या पाच वर्षांपासून जालना पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस उपनिरीक्षकाची जबाबदारी पार करत असताना पल्लवी जाधव आपले छंदही जोपासतात. या छंदामध्येच त्यांनी यश मिळवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here