Home मराठी Photo Gallery | नागपूरकरिता पाण्याच्या नियोजनासाठी अरुण लखानी यांना फिक्की चा...

Photo Gallery | नागपूरकरिता पाण्याच्या नियोजनासाठी अरुण लखानी यांना फिक्की चा पुरस्कार

Arun Lakhani Chairman & MD at Vishvaraj Infrastructure Ltd.

फिक्की ने नुकताच विश्वराज एनवायरनमेंट प्राइवेट लिमिटेड चे सीएमडी अरुण लखानी यांना 2020 चा आपला पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. लाखानी यांनी पीपीपी प्रोजेक्ट च्या माध्यमातून नागपूर शहरातील वापरात आलेल्या सांड पाण्यावर प्रक्रिया करून त्याला पुःन वापरण्या योग्य बनविले. मुख्य म्हणजे पहिले हेच सांड पाणी नाल्याच्या माध्यमातून वाहून जायचे.

विश्वराज एनवायरनमेंट प्राइवेट लिमिटेड चे सीएमडी अरुण लखानी यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या सेवेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) योजनेच्या माध्यमातून नागपूर शहराने पुढील 35 वर्षांकरिता आपल्यासाठी लागणाऱ्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. मुख्य म्हणजे शहरात वापरानंतर वाहून जाणार्या सांड पाण्यावरील योजनेच्या माध्यमातून जो पाणी प्रक्रियेनंतर तैयार होत आहे त्याचा वापर आता परिसरातील पावर प्लांट करू लागले आहेत. त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना फिक्की ने वर्ष 2020 चा पुरस्कार दिला आहे.

असे म्हणतात की शहरांमध्ये जितक्या पाण्याची आवश्यकता असते त्यापैकी वापरा नंतर 80 टक्के पाणी सांडपाणी म्हणून नाल्यात वाहून जातो. या सांडपाण्या पैकी 30 टक्के पाणी आज देशभरात प्रक्रिया करून दुसऱ्यांदा वापरात आणल्या जात आहे. आज देशातील जास्तीत जास्त शहरांमध्ये पाण्याचे मूळ स्त्रोत प्रदूषित झालेले आहेत. अशा स्थितीत सेवेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) च्या माध्यमातून या सांडपाण्यावर प्रक्रिया करून याचा पुनर्वापर करण्याची गरज भासू लागली आहे.

आज नागपूर शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या घरात आहे म्हणजे 700 एमएलडी शुद्ध पाण्याची गरज नागपूरकरांना रोज असते. 550 एमएलडी पाणी दर दिवशी वापरानंतर सांडपाणी म्हणून नाल्यांच्या माध्यमातून वाहून जातो. यामुळे नागपूर महानगरपालिकेने विश्वराज एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह तीस वर्षांकरिता करार करून पीपीपी तत्वावर ट्रीटमेंट प्लांट सुरू केले आहे.

जून 2018 मध्ये 200 एमएलडी सांडपाण्यावर ट्रीटमेंट करण्याच्या प्लांटची सुरुवात झाली. यापैकी 190 एमएलडी पाणी महाजेनको आपल्या खापरखेडा आणि कोराडी प्लांट करिता वापरत आहे. वाचलेल्या 1500 एमएम पाण्याला वेगवेगळ्या पाइपलाइनच्या माध्यमातून शहरापर्यंत पोहोचविले जात आहे. नागपूर महानगरपालिके ची आर्थिक स्थिती बरी नसल्यामुळे पीपीपी तत्वावर ही योजना सुरू झाली आणि आज अरुण लखानी यांच्या प्रयत्नाने नागपूर शहराला पुढील 35 वर्षाच्या शुद्ध पाण्याचं नियोजन करणे शक्य झाले. त्यांच्या याच कार्याला बघून निक्की ने 2020 चा आपला पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here