Home हिंदी पुणे रेल्वे स्थानकाचं प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये!, रेल्वे म्हणते डिस्टेंसिन्ग साठी वाढ

पुणे रेल्वे स्थानकाचं प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये!, रेल्वे म्हणते डिस्टेंसिन्ग साठी वाढ

338
0

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत वाढवून 50 रुपये केली आहे. रेल्वेच्या निर्णयानंतर सोशल मीडियापासून राजकीय नेत्यांमध्येही यावरून चर्चा होताना दिसात आहे. प्लॅटफॉर्म तिकीटाच्या किंमतीत अचानक मोठी वाढ झाल्यामुळे सर्वांना धक्काच बसला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर अचानक वाढवण्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, गर्दी कमी करण्यासाठी आणि अनावश्यक कामासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करणाऱ्यांना रोखण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

रेल्वे प्रवक्त्यांनी ट्वीट करत सांगितलं की, ‘पुणे जंक्शनवरील प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर 50 रुपये करण्याचा मुख्य उद्देश अनावश्यक कारणासाठी स्थानकावर गर्दी करणाऱ्यांवर रोख लावणं हाच आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच पालन करणं शक्य होईल. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच अशाप्रकारे नियंत्रित करण्यात आले आहेत.’ मात्र सामान्य यात्रेकरू या निर्णयाच्या विरोधात आहेत. सोशल मीडिया मध्ये या विरोधात लोकं खुलून बोलत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here