Home हिंदी सोलर एनर्जी : वीजेची बिलं भरेनासी झाली, सौर ऊर्जेचा घ्या फायदा

सोलर एनर्जी : वीजेची बिलं भरेनासी झाली, सौर ऊर्जेचा घ्या फायदा

1172

आत्मनिर्भर खबर डॉट कॉम डेस्क: रेडिओ, फ्रीज, कूलर, फोन, मोबाईल या चैनीच्या वाटणार्‍या पूर्वीच्या वस्तू आज काळाची गरज ठरल्या आहेत. याच प्रमाणे सध्या महाग आणि चैनीची वाटत असली तरीही “सौर ऊर्जा” अर्थात सोलर एनर्जीची गरज निर्माण होऊ लागली आहे…

देशात सध्या बहुसंख्य वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाच्या सहाय्याने वीज निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी लागणार्‍या कोळशाच्या किंमती वाढत आहेच. वीज निर्मितीसाठी पुरविला जाणारा कोळसा, त्याची उपलब्धता, गुणवत्ता इ. बाबी फारशा गांभीर्याने घेतल्या जाताना दिसत नाहीत. परिणामी उपलब्ध होणार्‍या कोळशातून बराच कोळसा वाया जातो, फेकून द्यावा लागतो अशी वीज निर्मिती केंद्रांची ओरड असते. लोकसंख्या वाढीबरोबर वीजेची मागणी देखील वाढतच जाणार हे सत्य नाकारले जाऊ शकत नाही.

‘वीज द्या- बिल घ्या’ चा सूर

गेल्या काही वर्षात वीज महाग झाली असून सततच्या भार-नियमनामुळे अनेक वीजग्राहक वीजेची बिलं भरेनासे झाले असून ‘वीज द्या- बिल घ्या’ असा अनेकांचा सूर आहे, याचबरोबर वाढत्या थकीत बाकीमुळे वीज कंपनीचा तोटा वाढतो आहे. अनेक शासकीय, निमशासकीय संस्थांकडे वीजेची मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वीज चोरीकडे राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करावे लागत असल्याची वीज कंपनीचीच तक्रार असते. ठिकठिकाणच्या ट्रान्सफार्मरला लागणारे इंधन देखील महाग झाले आहे. उन्हाळ्यात वीजेची मागणी जास्त होत असून ग्रामीण भागात विशेषतः शेतीला जास्त पाण्याची आवश्यकता असते, परंतु किमान बारा तासांच्या भार-नियमनामुळे, अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काही वेळा तर पीक हातचे जाण्याच्या, जळण्याच्या आणि शेतकरी बांधवांचा हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा पडत असल्याच्या घटना घडतात.

सौर ऊर्जेचे महत्व पटले

सूर्याच्या ऊर्जेच्या सहाय्याने वीज-निर्मिती करण्याची आता गरज आहे. सौर ऊर्जेचे महत्व नागरिकांना पटले असून त्याचा प्रभाव अगदी ग्रामीण भागातही पडलेला तेथील सौरऊर्जेच्या पथदिव्यांवरून दिसून येतो. शहरात सुद्धा उद्याने, सार्वजनिक ठिकाणांवर सौर ऊर्जेच्या सहाय्याने चालणारे पथदिवे बसविण्यात येऊन ते व्यवस्थित कार्य करीत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी सौर कंदिलांचा वापरही करण्यात येत असून अवघ्या पाच वर्षांपूर्वी धनाढ्यांच्या गच्चीवर दिसणारी ‘सोलर सिस्टीम’ आता मध्यम वर्गीयांच्याच नव्हे, तर ग्रामीण भागातही दिसू लागली आहे. Life Time Investment असे याला म्हटले जाते. ‘सोलर पॅनल’ द्वारे वाहन चालविण्यासह ऊर्जा तयार करून वीज निर्मिती ही संकल्पना आता देशात रूढ होत आहे. वाट्टेल तितकी वीज, चोवीस तास वीज निर्मिती होऊन विकास साधणारी ही योजना साकार झाल्यास सौर ऊर्जा लवकरच काळाची गरज ठरेल, तो दिवस दूर नाही!

Previous articleवायरल : रिपोर्ट आई निगेटिव तो कोविड सेंटर में ‘फिकर नॉट’ गाने पर करने लगे डांस
Next articleपुणे रेल्वे स्थानकाचं प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये!, रेल्वे म्हणते डिस्टेंसिन्ग साठी वाढ
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).