Home मराठी Nagpur | नागभवन येथे महावितरणचे उपकेंद्र व नव्या इमारतीचे लोकार्पण

Nagpur | नागभवन येथे महावितरणचे उपकेंद्र व नव्या इमारतीचे लोकार्पण

602

सिव्हिल लाईन्स परिसरास खात्रीशीर वीज पुरवठा – ऊर्जा मंत्री राऊत

नागपूर ब्युरो : महावितरणकडून नव्याने बांधण्यात आलेल्या सिव्हिल लाईन्स परिसरातील नाग भवन ३३/११ केव्ही वीज उपकेंद्र तसेच सेमिनरी हिल्स येथील वीज उपकेंद्रात बसविण्यात आलेल्या १० एमव्हीए क्षमतेच्या अतिरिक्त रोहित्रामुळे या परिसरातील वीज ग्राहकांना खात्रीशीर आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळणार असल्याची ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर पालकमंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांनी परिसरातील वीज ग्राहकांना दिली. नामदार राऊत यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार विकास ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

३३ / ११ के.व्ही सेमिनरी हिल्स उपकेंद्रामधुन एकुण दहा ११ के.व्ही . वाहिन्या निघत असून तेथे १० एम.व्ही.ए.चे एकच रोहित्र कार्यान्वित होते. उच्च मागणी पुरवठयादरम्यान वरील रोहित्र हे अतिभारीत होत असल्याने ग्राहकांना योग्य दाबाचा निरंतर वीज पुरवठा करण्याकरीता सेमिनरी हिल्स उपकेंद्र येथे अतिरिक्त १० एम.व्ही.ए. चे रोहित्र कार्यान्वित करण्यात आले आहे. सदर रोहित्र एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत मिळालेल्या अतिरिक्त निधीतून कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या कामासाठी एकुण रु .४.४७ कोटी खर्च आला असून सेमिनरी हिल्स उपकेंद्र येथील अतिरिक्त रोहित्रामुळे आकारनगर , स्वामी कॉलनी , गौरखेडे कॉलनी , दिपकनगर , उत्कर्षनगर , जागृती कॉलनी , फ्रेंन्डस् कॉलनी , रचना सायंतरा , गिटटी खदान , सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स , वेर्टेनरी कॉलेज इत्यादी परिसर लाभान्वित होणार आहे.

सिव्हील लाईन्स नागभवन व परिसरात ११ के.व्ही धरमपेठ व ११ के.व्ही जीपीओ उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या परिसरात रविभवन , हैद्राबाद हाऊस , नागभवन , न्यायालये , विभागीय आयुक्त कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय , पोलिस मुख्यालय , जीपीओ आमदार निवास , देशपांडे सभागृह , इतर महत्वाची शासकीय कार्यालये तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने व शासकीय वसाहती येतात . त्यामुळे सदर परिसरात सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी ३३/११ के.व्ही . उपकेंद्राची आवश्यकता होती . त्यानुसारएकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत नागभवन येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे १ x १० एम.व्ही.ए. क्षमतेचे ३३ / ११ के.व्ही जी.आय.एस. उपकेंद्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत उभारण्यात आलेले आहे.

सदर उपकेंद्रामुळे नागभवन परिसरातील वीज वाहिन्यांची लांबी कमी झाली व वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण होवून वीज ग्राहकांना योग्य दाबाचा व अखंडीत वीज पुरवठा करणे महावितरणला शक्य होणार आहे. नागभवन उपकेंद्राच्या उभारणीकरीता एकुण रु .५.४४ कोटी खर्च झालेला असून यामुळे सिव्हील लाईन्स परिसरातील सर्व महत्वाची प्रशासकीय कार्यालये , उच्चन्यायालय व इतर अतिमहत्वाचे व्यक्तींची निवासस्थाने व शासकीय वसाहती लाभान्वित होतील.अशी माहिती ऊर्जामंत्री यांनी आपल्या भाषणात दिली.

सर्व कर्मचाऱ्यांनी ग्राहकसेवेचे ब्रीद पाळून उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध रहावे. ग्राहकांच्या प्रत्येक तक्रारींचे वेळीच निवारण होईल आणि ग्राहक संतुष्ट होऊ शकेल या दृष्टीने आपले कार्य असले पाहिजे. ग्राहकांच्या शंका निरसनासाठी व संतुष्टीसाठी आपल्या विभागातर्फे नवनवीन उपक्रम सातत्याने राबविण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले. या प्रसांगी नागपूर महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक किशोर जिचकार, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, राकेश जनबंधू, हरीश गजबे ,अजय खोब्रागडे, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर, राजेश घाटोळे, राहुल जीवतोडे, समीर टेकाडे, हेमराज ढोके उपस्थित होते.

Previous articleNana Patole | पीएम मोदी के खिलाफ बगावत करने वाले यह नेता बनाए गए नए महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष
Next articleपेट्रोल – डीजल की वृद्धि के विरोध में केंद्र सरकार के खिलाफ शहर शिवसेना का आंदोलन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).