Home मराठी ‘मेट्रो संवादा’तून भंडारा-साकोलीतील नागरिक, विद्यार्थ्यांशी संवाद

‘मेट्रो संवादा’तून भंडारा-साकोलीतील नागरिक, विद्यार्थ्यांशी संवाद

585

भंडारा ब्यूरो : नागपुरातील मेट्रो ही केवळ नागपूरकरांच्या सोयीसाठीच नसून विदर्भातील तमाम नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. केवळ प्रवासच नव्हे तर प्रवासाव्यतिरिक्त अनेक लाभ मेट्रोच्या माध्यमातून असल्याचा संदेश देण्यासाठी नागपूर मेट्रोच्या माध्यमातून भंडारा आणि साकोलीतील नागरिकांशी संवाद साधला.

भंडारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित विदर्भ मेट्रो संवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते. तर साकोली येथे कृष्णमुरारी कटकवार विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. नागपूर मेट्रोच्या वतीने रश्मी मदनकर यांनी मेट्रोविषयी संपूर्ण माहिती दिली. नागपूर मेट्रो ही विदर्भाची शान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोमध्ये प्रवाशांची काळजी घेतली जाते.

प्रत्येक फेरीनंतर मेट्रो सॅनिटाईज करण्यात येते. सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यात येते. महिला सुरक्षेच्या दृष्टीनेही मेट्रो सुरक्षित असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे. प्रवाशांच्या खिशाला परवडेल असे तिकीट दर आहेत. स्मार्ट कार्ड घेतले तर त्यामध्यमातूनही सवलतीच्या योजना आहे. मेट्रो सेवा फीडर सर्व्हिस ने जोडल्या आहेत. ग्रीनेस्ट मेट्रो म्हणून नागपूर मेट्रोची ओळख असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. साकोली येथे नगराध्यक्ष शरीमती राऊत, प्राचार्य विजय देवगीरकर, क्रीडा संघटक शाहेर कुरेशी तर भंडारा येथील कार्यक्रमात पत्रकार, डॉक्टर, व्यावसायिक मंडळी उपस्थित होते.

Previous articleBhandara Hospital Fire | नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू
Next articleBhandara Hospital Fire | सरकारी दवाखाण्याचे ऑडिट व्हायला पाहिजे : देवेंद्र फडणवीस
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).