Home हिंदी नवनीत राणा आयसीयूतून बाहेर, म्हणाल्या- मरता मरता वाचले

नवनीत राणा आयसीयूतून बाहेर, म्हणाल्या- मरता मरता वाचले

329
0

मुंबई: श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं उपचारासाठी नागपूरहून मुंबईत हलवण्यात आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. आयसीयूतून बाहेर येताच त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. ‘आपल्या प्रार्थनांमुळेच मी मरता मरता वाचले,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

https://www.facebook.com/navneetkaurranaofficial/videos/290358368930565/

खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाल्याचे 6 ऑगस्ट रोजी समोर आले होते. त्यानंतर अमरावतीतील घरीच राहून त्या उपचार घेत होत्या. मात्र, पाच दिवसानंतरही प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्यानं त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथंही प्रकृतीला आराम न पडल्यानं त्यांना नागपूरमधील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं गुरुवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यानंतर त्यांना तातडीनं मुंबईला हलवण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आज त्यांना आयसीयूतून सर्वसाधारण कक्षामध्ये शिफ्ट करण्यात आलं.

आयसीयूबाहेर आल्यानंतर नवनीत राणा यांनी हितचिंतकांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. गेले पाच-सहा दिवस जो माझा प्रवास झाला, तो खूपच कठीण होता. माझ्या मतदारसंघातील जनता आणि माझे कुटुंबीय देखील काळजीत होती. मात्र, सर्वांच्या आशीर्वादामुळं आणि प्रार्थनांमुळं मी मरता मरता वाचले. मला आता बरे वाटत आहे. कुणीही चिंता करू नये. केवळ हे सांगण्यासाठीच हा व्हिडिओ मी शेअर करत आहे. जनतेची कामे करण्यासाठी देवानं मला एक संधी दिली पाहिजे, अशी प्रार्थना मी आजारी असताना करत होते. ती देवाने ऐकली. चांगलं काम आणि माझ्या माणसांच्या प्रार्थना पाठिशी असल्यामुळं मी यातून बाहेर आले. लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन, असंही त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. सर्व जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here