Home हिंदी आनंदाची बातमी : जिल्हाबंदीतून एसटी ची होणार सुटका : वडेट्टीवार

आनंदाची बातमी : जिल्हाबंदीतून एसटी ची होणार सुटका : वडेट्टीवार

783
0

चंद्रपूर: मागील चार महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील आंतरजिल्हा एसटी बससेवा कोविड बाबतचे नियम पाळून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती
राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. मुख्यमंत्री यासंदर्भात अनुकूल असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चाही झाली आहे. पुढील आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लॉकडाऊन सुरू झाले तेव्हाच राज्यातील एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. अनलॉक प्रक्रिया सुरू होऊन अनेक निर्बंध शिथील होत असताना मर्यादित एसटी सेवेलाही परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सध्या ५० टक्केच प्रवासी, या अटीवर एसटी धावत आहेत. ही बससेवा फक्त जिल्हांतर्गत आहे. जिल्ह्याची वेस ओलांडण्याची परवानगी सध्या एसटीला नाही. वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती लक्षात घेता एसटीला असलेली जिल्हाबंदी लवकरच उठण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकप्रकारे प्रवाशांनाही जिल्हाबंदीतून काही अंशी दिलासा मिळणार आहे.

कोचिंग सुद्धा होणार सुरु
राज्यातील कोचिंग क्लासेस करोना नियम पाळून प्रारंभ करण्याची सरकारची तयारी आहे. ज्याप्रमाणे जीम सुरू केले, त्याच धर्तीवर नियम लाऊन कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा विचार आहे, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. ऐन संकटकाळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले आहे.

Previous article‘पोलीस बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी सुरू’, फडणवीसांचा गंभीर आरोप
Next articleनवनीत राणा आयसीयूतून बाहेर, म्हणाल्या- मरता मरता वाचले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here