Home मराठी Nagpur | 4 जानेवारी पासून पूर्ण वेळ विधानमंडळ सचिवालय

Nagpur | 4 जानेवारी पासून पूर्ण वेळ विधानमंडळ सचिवालय

451
0

नागपूर ब्यूरो : महाराष्ट्र विधानमंडळाच्या प्रतिवर्षी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर विधानमंडळ सचिवालयाचे तेथील कार्यालय बंद करण्यात येऊन विधानभवन, मुंबई येथे सुरू करण्यात येते. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता उर्वरीत कालावधीत तेथील कार्यालय कामकाजाकरीता बंद असते. आता सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद व अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचा समावेश असलेल्या मंडळाने विधानभवन, नागपूर येथील कार्यालय वर्षभराकरीता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार विधानभवन, नागपूर येथे विधानमंडळ सचिवालयाच्या नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या कक्षाचा उद्घाटन समारंभ सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद व अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांच्या शुभहस्ते व उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद व उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दिनांक 4 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता, राष्ट्रकुल संसदीय मंडळ कक्ष, पहिला मजला, जुनी इमारत, विधानभवन, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here