Home हिंदी सीआरपीएफ चे उपमहानिरीक्षक प्रशांत जांभुळकर यांनी केला मेट्रो ने प्रवास

सीआरपीएफ चे उपमहानिरीक्षक प्रशांत जांभुळकर यांनी केला मेट्रो ने प्रवास

327
0

लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते सीआरपीएफ कॅम्पस पर्यंत फिडर सेवा उपलब्ध

नागपूर ब्यूरो : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या आॅरेंज आणि अ‍ॅक्वा लाईन येथे दर 15 मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पोलीस उपमहानिरीक्षक प्रशांत जांभुळकर ह्यांनी त्यांच्या सहकाºयांसह महा मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवरील लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान मेट्रोने प्रवास केला.

नागपूर मेट्रोचा प्रवास सोईस्कर, सुखकर व सुरक्षित असून नागपूरकरांनी तसेच सीआरपीएफ येथे रहिवासी असलेल्या जवान व त्यांच्या कुटुंबीयांनी मेट्रो सेवेचा उपयोग करावा. मेट्रोच्या स्वरूपात अत्यंत चांगली सुविधा आज शहरातील नागरिकांना उपलब्ध असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मेट्रोचा उपयोग करावा असे आवाहन डीआयजी जांभुळकर यांनी केले. नागपुरातील जनतेने मोठ्या संख्येने मेट्रोचा उपयोग करून वाहतुकीच्या समस्येवर मात करण्यासाठी योग्य मार्ग निवडावा असेही ते म्हणाले.

मेट्रो प्रवासा नंतर पोलीस उपमहानिरीक्षक जांभुळकर व कमांडिंग आॅफिसर सुभाष चंद्रा यांनी मेट्रो भवन येथे भेट देत मेट्रोचे संचालन कश्या प्रकारे केल्या जाते याची माहिती घेतली. त्यांनी ओसीसी सेंटरची पाहणी केली व महा मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे यांच्याशी विस्तृत चर्चा केली. यात लास्ट माईल कनेटेव्हिटी अंतर्गत लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते सीआरपीएफ कॅम्पस पर्यंत फिडर सेवा प्रदान करने, इलेक्ट्रिक फिडर वाहनांकरिता कॅम्पस परिसरात ई- स्टेशन उभारणे, कॅम्पस परिसरात महा मेट्रोचा स्टॉल उभारून प्रकल्पाची माहिती तसेच महा कार्ड चे वितरण करने, लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथे सीआरपीएफ द्वारे वॉल आॅफ फ्रेम उभारून नागरिकांना माहिती तसेच मेट्रो सेवेचा उपयोग करण्याकरिता प्रोत्साहित करने तसेच नागपूर व राज्यातील शहीद जवानांच्या बलिदाना बद्दल अवगत करणे, सुरक्षित आणि सुरळीत फिडर सर्विस करिता सीआरपीएफ जवानांची लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथे तैनाती करने, ख्रिसमस डे, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन तसेच अन्य महत्वाच्या दिवशी पोलीस बँडचे मेट्रो स्टेशन येथे संचालन करने या सर्व बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली.

फीडर सेवा सुरु: नागपूर मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवर (रिच 3) येथील मुख्य आणि महत्वपूर्ण रहिवासी परिसर म्हणजे सीआरपीएफ कॅम्प. हा कॅम्प या मार्गिकेच्या नजीक असून या परिसरात राहणारे सीआरपीएफचे जवान आणि त्यांचे कुटुंबीय अशी फार मोठी लोकसंख्या या भागात राहते. या परिसरात अंदाजे 2500 इतकी लोकसंख्या आहे.

या कुटुंबियांना विविध कामासाठी शहरात इतर ठिकाणी जावे लागते. त्यांना मदत व्हावी म्हणून नागपूर मेट्रोने त्यांच्याकरता मेट्रोचा प्रवास अधिक सोपा आणि सुविधा जनक करण्याचा मानस केला आहे. त्याच अनुषंगाने सीआरपीएफ गेट पासून मेट्रो स्थानकापर्यंत आणि स्थानकापासून ते गेट पर्यंत फीडर सेवा सुरु करण्यात आली आहे. या मागचा मुख्य उद्देश सुरक्षित मेट्रो सेवा नागरिकांना प्रदान करणे या सेवेचा उपयोग कॅम्पसमध्ये येणारे नागरिक, कर्मचारी वर्ग यांना मोठ्या प्रमाणात होईल.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here