Home हिंदी WhatsApp | नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून होऊ शकतं बंद

WhatsApp | नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून होऊ शकतं बंद

पुणे ब्यूरो : मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वापरात असणाऱ्या व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपमध्ये अनेक बदल झाले, खूप अपडेटही आले. या अॅपचा वापर इतका सर्रास झाला की अनेकांसाठी महत्वाच्या कामांमध्येसुद्धा संदेश देवाणघेवाणीसाठी व्हॉट्सअॅपलाच प्राधान्य देण्यात आलं. पण, आता मात्र ही परिस्थिती काहीशी बदलणार आहे. कारण, 1 जानेवारी 2021 पासून काही अॅन्ड्रॉईड कार्यप्रणाली आणि आयफोन डिवाईसवर व्हॉट्सअॅप काम करणार नाहीये.

यावर चालणार नाही व्हॉट्सअॅप

iOS 9 आणि अँड्रॉईड 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टम नसणाऱ्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. यासंदर्भातील यादीही जाहीर करण्यात आली आहे. ऑपरेटींग सिस्टीमच्या नव्या व्हर्जनचा वापर करण्याचा सल्लाही व्हॉट्सअॅपकडून युजर्सना देण्यात आला आहे. असं केल्या नंतरच त्यांना मेसेजिंग अॅपमधील काही नवे फिचर्स वापरता येणार आहेत.

दरम्यान, व्हॉट्सअॅपच्या या नव्या व्हर्जनसाठी अ‍ॅपल कंपनीच्या (iPhone 4), (iPhone 4S), (iPhone 5), (iPhone 5S), (iPhone 6) आणि (iPhone 6S) ला ऑपरेटिंग सिस्टम iOS 9 च्या व्हर्जननं अपडेट करावं लागणार आहे. तर, (iPhone 6S), (6 Plus), (iPhone SE) हे फर्स्ट जनरेशनचे आयफोन असल्यामुळं ते iOS 14 वरून अपडेट करता येऊ शकतात.

एँड्रॉईड फोनच्या बाबतीत सांगावं तर, 4.0.3 सिस्टीम नसणाऱ्या (Device) वर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. अशा फोनमध्ये (HTC Desire), (LG Optimus Black), (Motorola Droid Razr), (Samsung Galaxy S2) चा समावेश आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here