Home हिंदी Hingna | उद्योजकांनी स्थानिकांना रोजगार प्रदान करावेत- कृपाल तुमाने

Hingna | उद्योजकांनी स्थानिकांना रोजगार प्रदान करावेत- कृपाल तुमाने

704

नागपूर ऑटो अंड इंजिनिअरिंग क्लस्टरचे भूमिपूजन

नागपूर ब्यूरो : हिंगणा एमआयडीसी शेकडो उद्योजक नागपूरचे आहेत, परंतु येथे काम करणारा कामगार पर प्रांतातून येत आहे. येथील लघु उद्योजकांनी स्थानिकांना रोजगाराच्या संधी द्याव्यात असे आवाहन शिवसेना नेते खासदार कृपाल तुमाने यांनी केले.

नागपूर नजीकच्या हिंगणा एमआयडीसी मध्ये नागपूर ऑटो अंड इंजिनिअरिंग क्लस्टरचे भूमिपूजन करताना रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी उद्योजक व नागरिकांशी व्यासपीठावरून संवाद साधला. खासदार कृपाल तुमाने यांनी नागपूर ऑटो अंड इंजिनिअरिंग क्लस्टर येथील लघु उद्योगांना बळकटी प्रदान करेल अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी पुढकार घेत आटो हब निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत.

मात्र हिंगणा एमआयडीसीमधील काही नाममात्र कंपन्या सोडल्या तर इतर कंपन्याविषयी लोकांना माहिती नाही. येथे शेकडो कंपन्या आटो पार्टस तयार करतात, त्या मोठ्या कंपन्यांना पुरवठा केल्या जातो. मात्र येथे स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याने या कंपन्या बाबत माहिती नाही. यामुळे येथील उद्योजकांनी स्थानिकांना रोजगार प्रदान केल्यास मोठ्या प्रमाणात स्थाईक बेरोजगार, विद्यार्थी व नागरिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. सध्या हिंगणा एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय काम करीत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.

त्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे व एमएसएमईचे अधिकारी यांनी नागपूर ऑटो अंड इंजिनिअरिंग क्लस्टरचे भूमिपूजन केले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).