Home हिंदी Nagpur Metro | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला मेट्रोने प्रवास

Nagpur Metro | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला मेट्रोने प्रवास

नागपूर ब्यूरो : नागपूर मेट्रो प्रकल्पाची एकूणच रचना अतिशय सुयोग्य असून महा मेट्रोचा आजवरचा हा प्रवास उपयुक्त आहे. लोकसेवा करीत महा मेट्रो तत्पर असून, मेट्रो गाडीचा माझा प्रवासाचा अनुभव अतीशय सुखकर असल्याचे मत व्यक्त करीत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री श्री रामदास आठवले यांनी महा मेट्रोला शुभेच्छा दिल्यात. एक्वा मार्गिकेवरील सुभाष नगर मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान मेट्रो गाडीने प्रवास करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत असलेले स्टेशन सुंदर असून मेट्रो गाडीने प्रवास करताना आपल्याला आनंद वाटल्याचे देखील ते म्हणाले. मेट्रोचे कर्मचारी प्रवाश्यांना मदत करीत असून या प्रकल्पाची व्याप्ती वाढली तर तो लोकप्रिय होईल, हा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. आपण पहिल्यांदाच नागपूर मेट्रोने प्रवास केला असून आपला हा अनुभव नक्कीच लक्षात राहण्यासारखा आहे, असे देखील ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री आठवले यांच्या मेट्रो प्रवासा दरम्यान त्यांचे कार्यकर्ते देखील सोबत होते. प्रवासा दरम्यान माननीय मंत्री महोदयांनी एकूणच मेट्रो प्रकल्पाची आस्थेने चौकशी केली. नागपूर मेट्रोच्या माध्यमाने लोक प्रतिनिधी प्रवास करीत असून आठवले यांचा हा प्रवास र्त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांकरता देखील महत्वाचा होता.


रीडर्स आप आत्मनिर्भर खबर डॉट कॉम को ट्वीटर, इंस्टाग्राम और फेसबुक पर फॉलो कर रहे हैं ना? …. अबतक ज्वाइन नहीं किया है तो अभी क्लीक कीजिये (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020) और पाते रहिये हमारे अपडेट्स.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here