Home हिंदी Corona Vaccine| केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी; पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना देणार

Corona Vaccine| केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी; पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना देणार

728

नवी दिल्ली ब्यूरो : मोदी सरकारनं कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे निर्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये कोरोना लसीकरण कसं केलं जाईल, तसेच याची संपूर्ण नियमावली राज्यांना पाठवली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं की, कोरोना लस आल्यानंतर ती लोकांपर्यंत कशी पोहोचवण्यात येईल, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे.

पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात येणार आहे. दरम्यान, कोणत्या कोरोना लसीचा पहिला डोस भारतात देण्यात येणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु, केंद्र सरकारने कोरोनाच्या लसीकरण्याची संपूर्ण तयारी केली आहे.

काय आहेत कोरोना लसीकरणाच्या गाईडलाईन्स

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 50 वर्षांवरील त्या व्यक्ती ज्यांना एखादा आजार आहे. तसेच 50 वर्षांखालील त्या व्यक्ती ज्या मधुमेह, कॅन्सर, हृदयरोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त आहेत. तसेच सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्स यांसारखे हेल्थ वर्कर्सना लस देण्यात येणार आहे. फ्रंटलाइन वर्कर्स म्हणजेच, तिनही सैन्यदलांचे प्रमुख, पॅरा मिलिट्री, म्युनिसिपल वर्कर्स आणि राज्यांतील पोलीस कर्मचारी.

पाच लोकांची टीम तयार करणार 

लसीकरणासाठी प्रत्येकी पाच लोकांची टीम तयार करण्यात येणार आहे. यांना वॅक्सिनेटर ऑफिसर म्हटलं जाईल. पहिला वॅक्सिनेटर ऑफिसर लसीकरणाच्या ठिकाणी असेल, जो सर्व आवश्यक कागदपत्र तपासल्यानंतरच कोरोना लस घेण्यासाठी सेंटरमध्ये येण्यास परवानगी देईल. त्यानंतर दुसरा ऑफिसर Co Win शी डेटा जोडून पाहिल. तिसरा वॅक्सिनेटर ऑफिसर डॉक्टर असून व्यक्तीला लस देण्याचं काम करणार आहे. उर्वरित दोन वॅक्सिनेटर 30 मिनिटांपर्यंत लसीचा डोस दिलेल्या व्यक्तीचं निरिक्षण करतील आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचंही काम करतील. लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे.

30 मिनिटांपर्यंत वाट पाहावी लागणार

लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केवळ Co Win वरच करता येणार आहे. हे अॅप केंद्रीय मंत्रालय, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनद्वारा अपलोड करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त 50 वर्षांवरील व्यक्तींना, जे एखाद्या आजाराने ग्रस्त असतील, ते स्वतः आपली माहिती अपलोड करु शकणार आहे. जर एखादी व्यक्ती स्वतः आपली माहिती अपलोड करत असेल तर त्या व्यक्तीला 15 डॉक्युमेट्सपैकी एखादं ऑफिसरला द्यावं लागेल. हे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्थ इंशोरन्स स्मार्ट कार्ड जे केंद्रीय श्रम मंत्रालयाने जारी केलेलं आहे, MNREGA जॉब कार्ड, पॅन कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफसद्वारे जारी करण्यात आलेलं पासबुक, पासपोर्ट, पेंशन डॉक्यूमेंट्स, सर्विस आयडेंटीटी कार्ड, वोटर कार्ड.

लसीकरणावेळी स्वच्छतेची घ्यावी लागणार काळजी

राज्य सरकारला लसीकरणासाठी आवश्यक असणारी तयारी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यासंदर्भात राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर तयार करण्यात आलेल्या कमिटीची बैठक पार पडली आहे. लसीकरणानंतर सिरिंज आणि इतर मेडिकल वेस्ट यांची विल्हेवाट कशी लावावी याबाबतही आदेश जारी करण्यात आले आहेत.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleHingna | उद्योजकांनी स्थानिकांना रोजगार प्रदान करावेत- कृपाल तुमाने
Next articleFarmers Protest | नितिन गडकरी बोले- हमारी सरकार किसानों को समर्पित, नहीं होगा अन्याय
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).