Home हिंदी Nagpur Metro | आरामदायक प्रवासा करिता मेट्रोचा उपयोग करा : राधाकृष्ण बी.

Nagpur Metro | आरामदायक प्रवासा करिता मेट्रोचा उपयोग करा : राधाकृष्ण बी.

659

वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण बघता सार्वजनिक वाहतूक सेवा अत्यंत महत्वाची

नागपूर ब्यूरो : ऍक्वा लाईन मार्गिकेवर काल पासून २ नवीन मेट्रो स्टेशन शंकर नगर चौक आणि रचना रिंग रोड जंक्शन नागरिकांच्या सेवेत सुरु झाले आहेत. तसेच ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी महा मेट्रोच्या ऍक्वालाईन मार्गिकेवरील सिताबर्डी इंटरचेंज ते रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला.

शहरामध्ये नागपूर मेट्रोच्या रूपात अतिशय चांगली वाहतूक प्रणाली तयार करण्यात आली आहे, आंतराराष्ट्रीय दर्ज्याची पायाभूत सुविधा आज नागपूर शहरामध्ये उपलब्ध आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी उपयोग करावा असे मत राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. मेट्रोचे तिकीट दर सर्व सामान्य व्यक्तींना परवडणारे आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शहराच्या कुठल्याही भागातून मेट्रो स्टेशन पर्यंत नागरिकांना पोहोचता येते. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पैसे वाचविण्यास मदत होत असून पर्यावरणराखण्यास देखील मदत होते.

येणाऱ्या काळात वाढती लोकसंख्या व वाढते शहरीकरण लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक सेवा अत्यंत महत्वाचा पर्याय आहे. एका ठिकाणाहून दूसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता अतिशय सोपी आणि आरामदायक प्रवासा करिता मेट्रोचा उपयोग नागरिकांनी करावा. लास्ट माईल कनेटीव्हीटी अंतर्गत शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचण्याकरिता महा मेट्रो आणि नागपूर महानगरपालिका नियोजन करीत आहे. कोविडच्या कालावधीमध्ये आपण कमीत कमी व्यक्तींशी संपर्क साधून नागपूर मेट्रोने सुरक्षित आणि चांगला प्रकारचा प्रवास करावा असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.


आमदार मोहन मते यांनी केली मेट्रोची राईड

सुरक्षेच्या सर्व उपाय योजनांसह सुरु असलेल्या नागपूर मेट्रोला शहरावासीयांचा योग्य प्रतिसाद मिळतो आहे. एकीकडे मेट्रो तर्फे प्रवाश्यांकरता विविध सोइ-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतानाच, दुसरीकडे नागपूरचे सन्माननीय लोक प्रतिनिधी देखील मेट्रोने प्रवास करत असून या निमित्ताने मेट्रोच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती घेत आहेत.

याच शृंखलेत दक्षिण नागपूर विधान सभा मतदार संघाचे आमदार मोहन मते यांनी गुरुवारी सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर आणि परत अशी मेट्रोची राईड केली. मते यांच्या सोबत सुमारे 75 कार्यकर्ते देखील या राईड मध्ये सहभागी होते. या आधी मध्य नागपूर विधान सभा मतदार संघाचे आमदार विकास कुंभारे, माजी आमदार, प्रो. जोगेंद्र कवाडे आणि प्रकाश गजभिये यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह मेट्रोने राईड केली होती.

आजचा मेट्रोचा प्रवास आपल्या करता अतिशय उपयुक्त आणि सुखकर असल्याचे मत मते यांनी प्रवासादरम्यान व्यक्त केले. नागपूरकरांकरता सर्वच दृष्टीने एक सुरक्षित प्रवासाचे साधन महा मेट्रो असून, प्रवासाच्या सुरवातीपासूनच या संबंधी सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे ते म्हणाले. रस्त्याने प्रवास करताना होणारा त्रास, मेट्रोने करताना होत नाहीच, शिवाय यात सर्व सोइ सुविधांचा लाभ देखील प्रत्येकाला घेता येतो, असे देखील ते म्हणाले. शिवाय प्रवासी भाडे अतिशय कमी असून, नागपूरकरांनी मेट्रोचा वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी केले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleडीआरडीओ द्वारा बनाई गई सब-मशीनगन प्रायोगिक परीक्षणों में खरी उतरी
Next articleNagpur | एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीसह भावाची हत्या
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).