Home हिंदी Nagpur | एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीसह भावाची हत्या

Nagpur | एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीसह भावाची हत्या

738

आरोपीने गुरुवारी रात्री रेल्वे खाली केली आत्महत्या

एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने आपल्या कथित प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसाढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याचं आता समोर आलं आहे.

नागपूर ब्यूरो : एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कथित प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मानकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

हजारीपहाड परिसरातल्या कृष्णनगरमध्ये गुरुवारी दुपारी धुर्वे कुटुंबातील मुलीच्या ( हत्या झालेल्या यशची मोठी बहीण ) मागे लागलेल्या माथेफिरुने धारधार हत्याराने आधी लक्ष्मीबाई आणि नंतर चिमुकला यशची हत्या केली. मिळालेल्या माहितीप्रमाणे गांधीबाग परिसरातला हा तरुण अनेक दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील तरुण मुलीच्या मागे लागला होता. मेहनत करून कुटुंब चालवणाऱ्या धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला समजूत घातली. त्यानंतर तिने त्या तरुणासोबत सर्व संपर्क तोडले होते. तरीही तो तरुण सतत धुर्वे कुटुंब राहत असलेल्या कृष्णानगर भागात यायचा. त्यामुळे ना इलाजाने धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला नागपुरातच दुसऱ्या परिसरात राहणाऱ्या मामाच्या घरी पाठवले होते.

गुरुवारी दुपारी धुर्वे दाम्पत्य आपल्या कामावर गेल्यानंतर घरी लक्ष्मीबाई आणि चिमुकला यश हे दोघेच होते. त्याच वेळी तो तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने आपल्या हातातील धारदार शस्त्राने लक्ष्मीबाई आणि यशचा खून केला. शेजाऱ्यांनी धुर्वे यांच्या घरातून आलेल्या आवाजानंतर तिथे जाऊन पाहिले असता दुहेरी हत्याकांडाची ही घटना उघडकीस आली. लगेच घटनेची माहिती धुर्वे दाम्पत्याने पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हत्या केल्यानंतर तरुण फरार झाला. त्यानंतर आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मानकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleNagpur Metro | आरामदायक प्रवासा करिता मेट्रोचा उपयोग करा : राधाकृष्ण बी.
Next article‘बॅन गंगा-जमुना’ मोहिम: गंगा जमूना वस्तीतून 8 अल्पवयीन मुलींची सुटका
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).