Home हिंदी Nagpur Metro | पर्यावरणपूरक प्रवासाकरिता मेट्रोचा उपयोग करावा : सीपी अमितेश कुमार

Nagpur Metro | पर्यावरणपूरक प्रवासाकरिता मेट्रोचा उपयोग करावा : सीपी अमितेश कुमार

620

नागपूर ब्यूरो : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर 15 मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. तसेच बुधवार पासून 2 नवीन मेट्रो स्टेशन शंकर नगर चौक आणि रचना रिंग रोड जंक्शन नागरिकांच्या सेवेत सुरु झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवार ला नागपूर चे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महा मेट्रोच्या ऑरेंज लाईन मार्गिकेवरील सिताबर्डी इंटरचेंज ते जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा प्रवास अत्यंत आरामदायक व आनंददायी होता, नागपूरकरांनी याचा वापर करावा असे मत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले. उत्तम दर्ज्याची सार्वजनिक वाहतूक सेवा नागपूर शहरात उपलब्ध असून, पर्यावरण व इतर सोई सुविधाच्या दृष्टीने नागपूर मेट्रोचा प्रवास नक्कीच उपयुक्त आहे.

महा मेट्रो तर्फे नॉन मेट्रो परिसरात कनेटिव्हिटी वाढवली जात असून ही अतिशय चांगली बाब आहे. नागरिकांनी स्वतःचे वाहन शक्य असेल तेवढे कमी वापरून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. मेट्रोच्या स्वरूपात अत्यंत चांगली सुविधा आज शहरातील नागरिकांना उपलब्ध असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मेट्रोचा उपयोग करावा असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिकांना केले. नागपुरातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने मेट्रोचा उपयोग करून वाहतुकीच्या समस्येवर मात करण्यासाठी योग्य मार्ग निवडावा असेही ते म्हणाले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleNagpur | इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांकाचा ‘कायाकल्प’ पुरस्कार
Next articleआज भूमिपूजन | संसद के नए भवन का PM मोदी करेंगे शिलान्यास
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).