Home हिंदी Nagpur | इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांकाचा ‘कायाकल्प’ पुरस्कार

Nagpur | इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांकाचा ‘कायाकल्प’ पुरस्कार

718

नागपुरातील चार केंद्र मानकरी : कार्यकारी महापौर व आयुक्तांच्या हस्ते पुरस्कार वितरण

नागपूर ब्यूरो : केंद्र शासनपुरस्कृत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत दिला जाणारा सन २०१७-१८ च्या कायाकल्प पुरस्काराची घोषणा राज्यसरकारने केली होती. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नागपूर महानगरपालिकेअंतर्गत संचालित इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्राने पटकाविला असून द्वितीय पुरस्कार फुटाळा प्राथमिक आरोग्य केंद्राने पटकाविला आहे. अन्य दोन आरोग्य केंद्रांना प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त झाला. या सर्व चमूंना बुधवारी (ता. 9) महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रथम पुरस्कार : इंदोरा UPHC केंद्र, नागपूर

कायाकल्प पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी महापौर मनीषा कोठे, आयुक्त राधाकृष्णन बी., आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. संजय चिलकर, सर्व्हेलन्स ऑफिसर, डॉ. साजीद खान, नोडल अधिकारी डॉ. श्रीमती वैशाली मोहकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार उपस्थित होते.

व्दितीय पुरस्कार : फुटाला UPHC केंद्र, नागपूर

यावेळी पुरस्कारप्राप्त नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि चमूला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व पुरस्कार कार्यकारी महापौर मनीषा कोठे, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रथम पुरस्कार दोन लाख रुपये व प्रमाणपत्र असून इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सिल्विया सोनट्टके, वर्षा चव्हाण व तेथील संपूर्ण चमूने पुरस्कार स्वीकारला. द्वितीय पुरस्कार दीड लाख रुपये व प्रमाणपत्र असून फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका यावलकर, धरती दुरूगवार व त्यांच्या चमूने पुरस्कार स्वीकारला.

तृतीय पुरस्कार : शांतीनगर UPHC केंद्र, नागपूर

राज्य स्तरावर प्रत्येकी 50 हजार रुपयांचे दोन प्रोत्साहन पुरस्कार जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता काटोरे परिचारिका अंकीता आणि शांतीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. मो. चिश्ती आणि राखी पाटील, पुष्पा सिलकार आणि त्यांच्या चमूने पुरस्कार स्वीकारला. हे पुरस्कार नागरी प्राथमिक आरोग्य केन्द्रांमध्ये स्वच्छता ठेवणे, बायो मेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट लावणे, सामुदायिक सहभाग आणि रुग्णांचा विश्वास कायम राखण्यासाठी दिल्या जातो.

चतुर्थ पुरस्कार : जागनाथ बुधवारी UPHC केंद्र, नागपूर

याप्रसंगी बोलताना कार्यकारी महापौर मनीषा कोठे म्हणाल्या, कोव्हिड काळात मनपाच्या आरोग्य यंत्रणेने उत्तम कार्य केले. यासोबतच अनेक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. मनपाचा आरोग्य दूत हा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. परंतु कोव्हिडमुळे नागरिकांच्या मनात भीती कायम आहे. आता कुष्ठरोग आणि क्षयरोगाचे सर्व्हेक्षण आरोग्य चमूतर्फे सुरू आहे. मात्र, नागरिक याचा संबंध कोव्हिडशी जोडून सर्व्हेक्षणाला सहकार्य करीत नसल्याचे लक्षात आले. आरोग्य चमूने नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी नगरसेवकांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी उपस्थित आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना केले.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी विजेत्या सर्व आरोग्य केंद्रांच्या चमूंचे अभिनंदन केले. मात्र नागपुरात 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या 26 केंद्रांनीही कायाकल्प पुरस्कार पटकावावा, असे आवाहन केले. ते म्हणाले, या पुरस्कारामध्ये राज्यभरातील अनेक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सहभागी झाले. नागपूर महानगरपालिकेने 19 जून 2017 रोजी यात सहभाग घेतला. याच काळात आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी टाटा ट्रस्ट सोबतीला आली. टाटा ट्रस्टने प्रत्येक कर्मचाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण दिले.

आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनीही यावेळी सर्व विजेत्या चमूंचे अभिनंदन केले. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनीही कायाकल्प पुरस्कार आणि नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या आरोग्य सेवेच्या विश्वासहर्तेवर प्रकाश टाकला. यावेळी शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. राजेश भुरे आणि टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन, अमर नवकर, मीनाक्षी गोकने, गोकूल हिंगवे, नरेश टेंभूर्णे, मुकेश शिंदे, श्रुती हांडे, यश फेडेवार, लक्ष्मण शिंदे आणि त्यांच्या चमूचा कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. राजेश भुरे यांनी केले. संचालन आरोग्य विभागाच्या समन्वयक दीपाली नागरे यांनी केले. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, परिचारिका आदी उपस्थित होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).