Home हिंदी कोरोना : नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास, उपचारांसाठी मुंबईला रवाना

कोरोना : नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास, उपचारांसाठी मुंबईला रवाना

670

अमरावती : खासदार नवनीत रवी राणा यांनां श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तात्काळ मुबई नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसारअँब्युलन्सद्वारे रस्तामार्गे नवनीत यांच्यासह आमदार रवी राणा मुबई कडे रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहिती अनुसार मुबंईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढचे उपचार होणार आहेत.

6 ऑगस्ट 2020 रोजी नवनीत राणा यांना कोरोना झाल्याचा अहवाल समोर आला होता. त्यावेळी नवनीत राणा यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात माहिती दिली होती.

“माझी मुलगी आणि मुलगा कोरोनाग्रस्त झाले. शिवाय, कुटुंबीयांतील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली. आई म्हणून मुलांची काळजी घेणं माझं आद्यकर्तव्य होतं. मुलांची आणि कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता घेता मलाही कोरोनाची लागण झाली,” अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली होती.

आपले आशीर्वाद आणि सदिच्छा यांच्या बळावर आम्ही कोरोनावर मात करू, अशी आशाही त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

Previous articleफैसला : मिजोरम में अब कार के लिए सिर्फ 10 लीटर पेट्रोल-डीजल ही मिलेगा
Next articleदेशभक्ति : वो गाने, जिन्हें सुनते ही दिल में भर जाता है जोश
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).