Home हिंदी आज पासून उड्डाण पुलावरून डावीकडे वळत मनीष नगर कडे जाणे शक्य

आज पासून उड्डाण पुलावरून डावीकडे वळत मनीष नगर कडे जाणे शक्य

803

नागपूर ब्यूरो : वर्धा मार्गावरील उड्डाण पुलावरून डावीकडे वळण घेत रेल-ओव्हर-ब्रिज (आरओबी) च्या माध्यमाने मनीष नगर कडे जाणे आता शक्य होणार असून उद्या (26 नोव्हेंबर) सकाळ पासून हा मार्ग रहदारी करता सुरु होणार आहे. यामुळे आता वर्धा मार्गावरून मनीष नगर भागाकडे प्रवास करणे अधिकच सुखकर होणार आहे.

वर्धा मार्गावरील बहू-स्तरीय वाहतूक व्यवस्थेचे लोकार्पण या महिन्याच्या 13 तारखेला झाले. या सोबतच मनीष नगरला जोडणाऱ्या रेल-ओव्हर-ब्रिज (आरओबी) आणि रेल-अंडर-ब्रिजचे देखील उद्घाटन झाले. मनीष नगर भागातील एकूणच रहदारी आणि आरओबी आणि आरयुबी वरून होणार्या प्रस्तावित वाहतुकीचा अंदाज घेत या दोन्हीही ठिकाणी वाहतूक एकेरी ठेवली होती. आरओबी वरील वाहतूक दुहेरी असावी या आशयाची मागणी नागपूरकर आणि विशेषतः मनीष नगर भागात राहणाऱ्या नागरिकांकडून येत होती.

या संबंधी महा मेट्रोने नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेला पत्र लिहीले आणि सर्व माहिती देत या संबंधी निर्णय घेण्याची विनंती केली होती. या संबंधाने वाहतूक शाखेने पत्र लिहीत मनीष नगर आरओबी दुहेरी करण्या संबंधीची सूचना महा मेट्रोला दिली. वाहतूक शाखेच्या सूचने प्रमाणे उद्या (२६ नोव्हेंबर) पासून या पुलावरील दुहेरी वाहतूक सुरु होणार आहे. त्यामुळे आता मनीष नगर ते वर्धा मार्गावरील उड्डाण पुलावर येणे – जाणे सहज शक्य होणार आहे. वर्धा मार्गावरील या उड्डाण पुलावर प्रवेश केल्यावर आता तेथून डावीकडे वळणे आता शक्य होणार आहे. मनीष नगर सोबतच बेस, बेलतरोडी भागात देखील जाणे अधिकच सोपे होणार आहे.

वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलचा वापर नागरिक करीत आहे. एकूण 3.14 कि.मी. लांबीच्या या डबल डेकर उड्डाणपूल सोबतच मनीष नगर रेल्वे क्रॉसिंगची पर्यायी व्यवस्था म्हणून उड्डाणपूल सोबत मनीष नगर आरओबी जोडण्यात आला आहे. महा मेट्रोने निर्माण केलेल्या आरओबीच्या माध्यमाने दुतर्फा वाहतूक शक्य आहे आणि त्या प्रमाणे तरतूद देखील केली आहे.

अश्या प्रकारे करावा आरओबी व आरयुबीचा उपयोग

1. मनीष नगर ते वर्धा रोड पर्यंत पोहोचण्याकरता डाव्या बाजूने रस्ता सुरु
2. छत्रपती चौकाकडून (उड्डाणपूल वरून) येताना मनीष नगर कडे जाऊ इच्छिणारे डावीकडे वळत आरओबीच्या माध्यमाने आपल्या ठरलेल्या ठिकाणी जाऊ शकतात.
3. मनीष नगर येथून विमान तळाकडे जाणाऱ्याला आरओबी वरून डावीकडे वळत सरळ जावे लागेल.
4. मनीष नगर वरून सीताबर्डीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाश्याला आरओबी वरून डावीकडे वळत सरळ जात उड्डाणपूल संपतो तिथे उतरावे लागेल आणि पुढून प्राईड चौकातून यु-टर्न घेत नंतर परत उड्डाणपुलाच्या माध्यमाने किंवा रस्त्यावरून तो सीताबर्डीकडे सरळ जाऊ शकतो.
5. वर्धेकडून येत मनीष नगर कडे जाणाऱ्या व्यक्तीला सरळ रस्त्यावरून जात मनीष नगरच्या दिशेने उजवीकडे वळावे लागेल आणि आरयुबीच्या मदतीने मनीष नगर कडे जाता येईल.
6. छत्रपती चौकाकडून उडाणपूला खालील मार्गाने येताना मनीष नगर कडे जाऊ इच्छिणारे डावीकडे वळत आरयुबीच्या माध्यमाने आपल्या ठरलेल्या ठिकाणी जाऊ शकतात.

वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).