Home हिंदी Nagpur City । तेजस्विनीच्या महिलांची मेट्रो ने सफर

Nagpur City । तेजस्विनीच्या महिलांची मेट्रो ने सफर

721

नागपूर ब्यूरो : सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ‘तेजस्विनी महिला मंच’ च्या 25 महिलांनी दि. 24 नोव्हेम्बर, मंगळवारला नागपूर मेट्रोच्या एक्वा लाईनवर मेट्रो ची सफर केली. सीताबर्डी इंटरचेन्ज मेट्रो स्थानकापासून सुरु झालेला हा प्रवास लोकमान्य नगर स्टेशन ते पुन्हा परत सीताबर्डीला येऊन थांबला. या प्रवासात महिलांनी नागपूर मेट्रोच्या स्थनाकावरील अंतर्गत सज्जा, स्वच्छता, सुरक्षेसाठी करण्यात आलेली व्यवस्था, मेट्रो स्थानकापासून मेट्रो ट्रेनमध्येसुद्धा करण्यात आलेल्या सोयी-सुविधा यांचा आढावा घेतला.

विशेषतः स्थानकांवर महिलांसाठी असलेली सुविधा, उदाहरणार्थ गरोदर महिलांसाठी किंवा छोट्या बाळांच्या आई असणाऱ्या महिलांना फीड करण्यासाठी रेस्ट रूम, महिलांसाठी विशेष बाथरूम्स याबद्दलची माहिती त्यान्ना देण्यात आली. मेट्रो गाडीला असलेला महिला विशेष कोच पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्याच कोचने या महिलांनी हा संपूर्ण प्रवास पार पाडला.

तेजस्विनी महिला मंचच्या पूजा राठी ह्यांनी मेट्रो स्थानकात प्रवेश करतांनाच होत असलेल्या आरोग्य तपासणीबद्दल समाधान व्यक्त केले. शारीरिक तापमान तपासणी तसेच संपूर्ण सॅनिटायझेशन, त्यानंतर तिकीट काढतांना परत हातात मिळणारे पैसेसुद्धा सॅनिटाईज झालेले असतात ह्याचे त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी प्लॅटफॉर्मपासून, लिफ्ट आणि मेट्रोतील सिटटींगपर्यंत करण्यात आलेल्या अरेंजमेंट्स यावर त्यांनी समाधान तसेच मेट्रोत प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने हे नियम पाळायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले

तेजस्विनी संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती किरण मुंदडा यांच्या मार्गदर्शनात या महिलांनी हा सफर अत्यंत आनंदाने पार पाडला. कोरोना काळात जी जी काळजी घ्यायला हवी ती सर्व या मेट्रोच्या प्रवासात व्यवस्थित घेतली जात असल्याने महिलानीं त्याच्या कुटुंबासह इतर कोणताही प्रवास टाळून, स्वतःच्या गाड्या घरीच ठेवून सुरक्षित आणि सोयीचा असा मेट्रोनेच प्रवास करावा असे किरण आवाहन करताना दिसल्या.

वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleयशवंतराव चव्हाण एक जाणते बहुआयामी व्यक्तिमत्त्व : दिलीप पनकुले
Next articleआज पासून उड्डाण पुलावरून डावीकडे वळत मनीष नगर कडे जाणे शक्य
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).