Home हिंदी नागपूर न्यूज बुलेटिन : अंबाझरी तलाव बळकटीकरणासंदर्भात त्वरीत कार्यवाही करा

नागपूर न्यूज बुलेटिन : अंबाझरी तलाव बळकटीकरणासंदर्भात त्वरीत कार्यवाही करा

752

नागपूर ब्यूरो : अंबाझरी तलाव हे नागपूर शहराचे वैभव आहे. शहराचे पुरातन वैभव जतन करून ठेवण्यासाठी त्याची योग्य देखभाल दुरूस्तीची गरज आहे. अंबाझरी ओव्हरलफ्लोची सुरक्षा भिंत जीर्ण झालेली आहे, शिवाय तलावाच्या पारीलाही भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. शहराचे वैभव जपताना नागरिकांची सुरक्षाही अत्यंत महत्वाची आहे. त्यादृष्टीने तलावाच्या बळकटीसंदर्भात आवश्यक कार्यवाही त्वरीत सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

अंबाझरी तलावाच्या सुरक्षेसंदर्भात शुक्रवारी (ता.23) महापौर संदीप जोशी यांनी मेट्रो, सिंचन विभाग व मनपाची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्र.उपायुक्त तथा उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सार्वजनिक अभियंत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवई, डॉ.चांदेवार, ढुमणे, मेट्रोचे अधिकारी आणि समाजसेवक प्रवीण महाजन उपस्थित होते.


मास्क न लावणा-या 220 नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (23 ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 220 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 14243 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 54,80,500/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 48, धरमपेठ झोन अंतर्गत 50, हनुमाननगर झोन अंतर्गत 19, धंतोली झोन अंतर्गत 11, नेहरुनगर झोन अंतर्गत 17, गांधीबाग झोन अंतर्गत 18, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 7, लकडगंज झोन अंतर्गत 9, आशीनगर झोन अंतर्गत 19, मंगळवारी झोन अंतर्गत 17 आणि मनपा मुख्यालयात 5 जणांविरुध्द शुक्रवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 8773 बेजबाबदार नागरिकांकडून रु 43 लक्ष 86 हजार 500 वसूल करण्यात आले आहे.


आता कोरोना बाधितांची क्षयरोग चाचणी, एक्स-रे, सीबीनॅट द्वारे होणार निदान

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये महत्वाची चार लक्षणे दिसून आढळल्यास आता क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनामध्ये घट अशी लक्षणे आढळणा-या कोरोनाबाधित रुग्णांची एक्स रे आणि सीबीनॅट द्वारे तपासणी करून क्षयरोग निदान करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांनी दिली.

विशेष म्हणजे, सर्व क्षयरुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. क्षयरोग कोरोना द्विदिशात्मक तपासणी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य कुटुंब कल्याण विभागाकडून दिल्या आहेत. सारी अथवा आयएलआय रुग्णांचीही क्षयरोगासाठी तपासणी करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत सारी व आयएलआय च्या 221 रुग्णांमधून 11 क्षयरुग्णांचे निदान झाले आहे. तीव्र श्वसन संक्रमण आजार सारी व इन्प्लुएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी एक्स रे व सीबीनॅट द्वारे क्षयरोगाचे निदान करण्यात येणार आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleअश्विन मेहाड़िया एनवीसीसी के पुन: अध्यक्ष निर्वाचित
Next articleसर्वोत्तम परिवहन साधन के तौर पर मेट्रो का उपयोग करें : प्रा. जोगेंद्र कवाडे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).