Home हिंदी नवरात्री उत्सव : मंदिर बंद असल्यामुळे भाविकांची निराशा, घेतले ऑनलाईन दर्शन

नवरात्री उत्सव : मंदिर बंद असल्यामुळे भाविकांची निराशा, घेतले ऑनलाईन दर्शन

721

कोराडी : शनिवारला शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली. कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान च्या वतीने शनिवारपासून नवरात्रास प्रारंभ झाला. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाने मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना या परिसरात प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे .परंपरेप्रमाणे नवरात्राच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला सकाळी चार वाजता पासून मातेच्या स्वयंभु दर्शनाला सुरुवात होते. दहा वाजेपर्यंत स्वयंभू दर्शनानंतर मातेचा शृंगार चढविला जातो व अकरा वाजता घटस्थापना केली जाते.

शनिवार ला या सर्व घटनांचे साक्षीदार होतांना भाविकांना लाईव्ह ऑनलाइनचा सहारा घ्यावा लागला .नवरात्र उत्सव स्थगित असल्यामुळे मंदिर बंद राहील परिसरात कोणालाही प्रवेश मिळणार नाही असे संस्थांननी जाहीर केल्यानंतरही काही भाविक मंदिर परिसरात आले .त्यांनी परिसरातूनच दर्शन घेण्यात समाधान मानले. या परिसरात पोलीस व सुरक्षा गार्ड तैनात केले असल्यामुळे मंदिराच्या जवळ कुणालाही प्रवेश दिला जात नाही. सायंकाळी पाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी केशवराव महाराज फुलझेले यांच्या हस्ते अखंड सामूहिक मनोकामना ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.

या वर्षी 350 ज्योती प्रज्वलित करण्यात आल्या. मंदिराच्या बाजूने असलेल्या नाहरावर त्यासाठी विशिष्ट पेंडॉल तयार करण्यात आला .यावेळी अशोक महाराज ,रामदास महाराज ,राजू महाराज ,मुकेश महाराज संस्थानचे विश्वस्त दत्तू समरीतकर ,अशोक खानोरकर ,दीपक बजाज व्यवस्थापक पंकज चौधरी, गणेश राऊत, रुपेश परिहार आदी प्रामुख्याने उपस्थित होते या वेळेला कोणत्याही भाविकाला प्रवेश देण्यात आला नाही.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleदंदे फाऊंडेशनच्या “दोन ओळींची स्पर्धेचा” निकाल घोषित
Next articleवायरल : कुदरत के इस क्रिएशन को देख आप क्या कहेंगे?
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).