Home हिंदी दंदे फाऊंडेशनच्या “दोन ओळींची स्पर्धेचा” निकाल घोषित

दंदे फाऊंडेशनच्या “दोन ओळींची स्पर्धेचा” निकाल घोषित

790

नागपूर ब्यूरो : डॉ. दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांच्या मार्गदर्शनात काही दिवसांपूर्वी फाऊंडेशनच्या मॉर्निंग पोस्टर्ससाठी दोन ओळींची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी नागपूर, अमरावती, यमवतमाळ, चंद्रपूर, अहमदनगर, जालना, पंढरपूर, रत्नागिरी आदी ठिकाणांहून एकूण 72 प्रवेशिका आल्या. डॉ. दंदे फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे म्हणाले की, “प्रत्येकाने उत्तम प्रयत्न केला आहे. मात्र आम्हाला त्यातून सर्वोत्तम पाच ते दहाच निवडायच्या होत्या. सकारात्मक विचार यातून अपेक्षित होता. परीक्षकांनी 8 सर्वोत्तम विचार मॉर्निंग पोस्टरसाठी निवडले आहेत. पुढील आठ दिवस डॉ. दंदे फाऊंडेशन विजेत्यांच्या नावासह त्यांच्या ओळी मॉर्निंग पोस्टरवर प्रसिद्ध करेल. डॉ. पिनाक दंदे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

विजेत्यांची नावे

फाऊंडेशनच्या मॉर्निंग पोस्टर्ससाठी घेण्यात आलेल्या दोन ओळींची स्पर्धा मध्ये किरण पिंपळशेंडे, नागपूर, गणेश आवताडे-पाटील, पंढरपूर, नेहा मोहगावकर, नागपूर, सुरेश देशमुख, नागपूर, आशा महाजन, नागपूर, फहीम खान, नागपूर, प्रवीण जनई, नागपूर आणि जया काळपांडे, नागपूर या विजेत्यांचा समावेश आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).