Home हिंदी ना. गडकरी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील 16 प्रकल्पांचा कोनशिला अनावरण समारंभ

ना. गडकरी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील 16 प्रकल्पांचा कोनशिला अनावरण समारंभ

496
0
  • महामार्गाचे काम पूर्ण झालेल्या10 प्रकल्पांचे लोकार्पण
  • आंध्रच्या अर्थव्यवस्थेला येणार गती, सन 2020-21 मध्ये 28 प्रकल्प पूर्ण

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग तसेच सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय महामार्गांच्या 16 प्रकल्पाचा कोनशिला अनावरण समारंभ पार पडला. तसेच महामार्गांचे काम पूर्ण झालेल्या 10 प्रकल्पांचे लोकार्पण ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यात विजयवाडा कनकदुर्गा उड्डाणपुलाचाही समावेश आहे.15592 कोटी रुपयांच्या या महामार्गांच्या कामांमुळे आंध्रप्रदेशातील अर्थव्यवस्थाच बदलणार असल्याचे याप्रसंगी ना. नितीन गडकरी म्हणाले. सन 2020-21 मध्ये महामार्गांच्या 28 प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
एकूण 1411 किमीच्या या महामार्गांमुळे आंध्रप्रदेशची औद्योगिकदृष्ट्या विकासाकडे वाटचाल होणार असून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी, केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री डॉ. व्हि. के. सिंग, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, रस्ते बांधकाम मंत्री मलागुंडला शंकरनारायण प्रामुख्याने उपस्थित होते.
ज्या प्रकल्पाचे आज ना. गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले, त्या 10 प्रकल्पांची एकूण लांबी 529 किमी असून 8 हजार कोटींचे हे प्रकल्प आहेत. कनकदुर्गा उड्डाणपुलामुळे इंद्राकीलाद्री टेकडीचा परिसरातील लोक विजयवाडा शहराला जोडले जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग 16 आणि राष्ट्रीय महामार्ग 65 यांना जोडणारा हा उड्डाणपूल आहे.

याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- आंध्र प्रदेशातील 5 हजार किमी महामार्गाचा विकास हा भारतमाला परियोजनेमार्फत केला जात आहे. याशिवाय 400 किमीचे रस्ते हाही या योजनेचा भाग राहणार आहे. रस्ते क्षेत्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन आहे. तसेच 335 किमीचा अनंतपूर अमरावती एक्सप्रेस मार्ग हाही भारतमाला परियोजनेतून विकसित केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

आजच्या कोनशिला अनावरण झालेल्या महामार्गाच्या प्रकल्पांची एकूण लांबी 873 किमी असून यासाठी 7366 कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी काही प्रकल्पांचे काम सुरु झाले असल्याचे सांगून ते म्हणाले- या प्रकल्पांमुळे वाहतूक सुलभ आणि सुरळीत होणार असून तसेच इंधन बचत आणि कमी वेळात प्रवास होणार आहे. आंध्र प्रदेशात सन 2014 पासून 32 हजार 250 कोटींचे महामार्गांचे प्रकल्प मंजूर झाले असून 24 हजार कोटी या प्रकल्पांवर खर्च झाले आहेत. सन 2020-21 पर्यंत 8869 कोटींचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत, असेही. ना. गडकरी म्हणाले.

पोर्ट कनेक्टिव्हिटी असलेले महामार्गाचे 24 प्रकल्प असून या प्रकल्पांची लांबी 404 किमी असून यासाठी 7004 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आजच्या कोनशिला अनावरण समारंभामध्ये बंगलोर चेन्नई एक्प्रेस महामार्गाचाही समावेश असून या महामार्गामुळे कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू ही तीन राज्ये जोडली जातील. 262 किमीचा हा महामार्ग असून चारपदरी आहे. 5175 कोटी रुपये या प्रकल्पाला खर्च येणार आहे. तसेच अमरावती (आंध्रप्रदेशातील) अनंतपुरम एक्सप्रेस महामार्ग चार जिल्हे ओलांडून जाणार आहे. 335 किमीचा हा एक्स्प्रेस महामार्ग असून 19877 कोटी खर्च करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. व्ही. के. सिंग आणि मुख्यमंत्री वाय. जगनमोहन रेड्डी यांनी मार्गदर्शन केले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here