Home हिंदी शेतकरी व कामगार विरोधी विधेयकांच्या विरोधात काँग्रेस चे धरणे आंदोलन

शेतकरी व कामगार विरोधी विधेयकांच्या विरोधात काँग्रेस चे धरणे आंदोलन

723

नागपूर ब्यूरो : केंद्रातील भाजप सरकारने संसदेत असंवैधानिकरित्या पारीत केलेल्या शेतकरी विरोधी व कामगार विरोधी विधेयकांच्या विरोधात तसेच उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या अमानुष घटनेच्या विरोधात शुक्रवारी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी च्या वतीने नागपूर जिल्ह्याच्या 13 ही तालुक्यात निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले.

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार राजु पारवे, जि.प.अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी आमदार एस.क्यु.जामा, प्रदेश काँग्रेस निरीक्षक रवींद्र दरेकर, जेष्ठ नेते नानाभाऊ गावंडे, सुरेश भोयर, गज्जु यादव, कुंदाताई राऊत, मुजीब पठाण, हुकुमचंद आमधरे, शकुर नागानी, प्रकाश वसु, श्रावण भिंगारे, सुदर्शन नवघरे, बाबा आष्टनकर आदी पदाधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध तालुक्यात आंदोलन करण्यात आले.


वीडियो :-काटोल येथे घेण्यात आलेली प्रेस कॉन्फ्रेंस….

 

प्रदेश काँग्रेस कमिटी निरीक्षक रवींद्र दरेकर यांच्या उपस्थितीत काटोल व नरखेड येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते हुकुमचंद आमधरे,प्रकाश वसु, काटोल तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश चव्हाण, नरखेड अध्यक्ष सुदर्शन नवघरे, नरेंद्र टाले, कुलदिप लोहे आदी मान्यवर उपस्थित होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).