Home हिंदी महात्मा गांधी जयंतीनिमित्त ऑनलाईन ग्लोबल कॉन्फरन्सचे आयोजन

महात्मा गांधी जयंतीनिमित्त ऑनलाईन ग्लोबल कॉन्फरन्सचे आयोजन

790

जयहिंद लोक चळवळीचा स्तुत्य उपक्रम , सॅम पित्रोदा, फ्रँक इस्लाम यांच्या सह आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ञांचा सहभाग

संगमनेर : सदृढ लोकशाही व निरोगी समाज निर्मितीसाठी कार्यरत असणार्‍या जयहिंद लोकचळवळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर या काळात जागतिक शांतता, सुसंवाद व प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय विश्लेषक सॅम पित्रोदा, अमेरीकेचे नेते फ्रँक इस्लाम यांसह आंतरराष्ट्रीय तज्ञांचा सहभाग असलेली ऑनलाइन ग्लोबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

या ग्लोबल कॉन्फरन्सबाबत माहिती देताना आ. डॉ. तांबे म्हणाले की, मागील 20 वर्षांपासून जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून युवकांना रचनात्मक कार्याची दिशा देत सदृढ लोकशाही व निरोगी समाज निर्मीती साठी काम होत आहे. जगातील सध्याची अस्थिरता व भीतीचे वातावरण यावर मात करत जागतिक शांतता, सामाजिक सलोखा व मानवतेच्या वृद्धीसाठी जयहिंद लोकचळवळच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांचा समावेश असलेल्या ग्लोबल कॉन्फरन्सचे ऑनलाईन आयोजन केले आहे.


ही ग्लोबल कॉन्फरन्स सर्व देशांमध्ये उपलब्ध होणार असून ‘जय हिंद’च्या फेसबुक पेज व सर्व सोशल माध्यमांवर उपलब्ध असणार आहे.

कुमार केतकर, सुरेश द्वादशीवार यांचे ही व्याख्यान

यामध्ये शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी पहिल्या सत्रात सायंकाळी 7 ते 8 या वेळेत महात्मा गांधी-शांतता, सुसंवाद आणि प्रगती या विषयावर भारतीय संगणक व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक स्व.राजीव गांधी यांचे सल्लागार व टेलीकॉम विझार्डचे संचालक आणि संशोधक सॅम पित्रोदा, इंडो अमेरीकन नागरी नेते व आयटी उद्योजक फ्रँक इस्लाम, जर्मनीचे राजकीय नेते क्लॉडिया क्रॉफर्ड, महराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, अमेरीकेतील न्यु जर्सी येथील एडिसनचे महापौर थॉमस लँकी, भारतातील जेष्ठ विचारवंत डॉ. संदीप वासलेकर, अमेरीकेचे मायकल क्रॉली यांच्या उपस्थितीत या सत्रात परिसंवाद होणार आहे. तर रात्री 8.30 ते 9.30 या वेळेतील दुसर्‍या सत्रात 21 व्या शतकात महात्मा गांधींच्या विचारांचे महत्व या विषयांवर जेष्ठ पत्रकार खा. कुमार केतकर, जेष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, तुर्कीचे इंग्रजी तज्ञ उगर इरूलकर,-ज्ञानेश्‍वर यवतकर, गार्गी गाडे मार्गदर्शन करणार आहे.

सुदृढ़ समाज आणि सामूहिक शेतीवर बोलणार

शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी तिसर्‍या सत्रात सायं 7 ते 8 या वेळेत ‘सदृढ समाज निरोगी समाज व्यवस्था’ या विषयावर जयहिंदचे संस्थापक आ. डॉ. सुधीर तांबे, औषधतज्ञ डॉ. रविंद्र गोडसे, इंग्लडमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ. संग्राम पाटील, ओमान देशामधील सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. नितू चाबरिया, सबरिना चौधरी, अरिफ रेहमान, डॉ. टायलर व्हर्नन हे मार्गदर्शन करणार आहेत. तर रात्री 8.30 ते 9.30 या वेळेतील चौथ्या सत्रात ‘सामूहिक शेती व शाश्‍वत उत्पन्न’ या विषयावर बारामती अँग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, कृषी विभागाचे सहाय्यक मुख्य सचिव डॉ. सुधीर गोयल, सौ. आदिती अमित देशमुख (लातूर), प्रशासकीय अधिकारी विमलेंद्र शरण, अन्न संधोधनातील डॉ. मुकुंद कर्वे, व्हीट्रीट चेलवन (पाँडेचरी) हे मार्गदर्शन करणार आहेत.

‘लोकशाही’ विषयावर बोलणार कन्हैया कुमार

रविवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी पाचव्या सत्रात सायं 7 ते 8 या वेळेत ‘महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व सामाजिक सुरक्षितता’ या विषयावर संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री कल्पना सरोज, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या फायनांन्स ऑफीसर पुजा कराचीवाला, सेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, डॉ. क्लारिसा (ऑस्ट्रेलिया), पल्लवी शिंदे (अमेरीका), डॉ. युझोमी यम्मामोटो (जपान), डॉ.हेमा अब्दुल हलीम (जॉर्डन), अ‍ॅड स्मिता सिंगलकर (नागपूर), प्रियंका वामन (अभिनेत्री) तर रात्री 8 ते 9 या वेळेतील सहाव्या सत्रात ‘लोकशाही’ या विषयावर कन्हैया कुमार, डॉ. कार्लस टर्नर (लंडन), जेष्ठ पत्रकार संजय आवटे, मायकल क्रावली (अमेरीका) -ज्ञानेश्‍वर मुळे, जर्मी केल्म (अमेरीका), हिरालाल पगडाल, केतकी भिसे (लंडन) हे संवाद साधणार आहेत.

तरी आंतरराष्ट्रीय तज्ञांचा सहभाग असलेले या प्रथम ग्लोबल कॉन्फरन्समध्ये अधिकाधिक तरुणांनी व नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे अवाहन जयहिंद लोकचळवळीचे समन्वयक संदीप खताळ, आंतरराष्ट्रीय समन्वयक अशोक खैरनार व आंतरराष्ट्रीय समन्वयक सुरज गवांदे व जयहिंद लोकचळवळ सर्व विभागांच्या वतीने करण्यात आले आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleमदतीचा हात : जान्हवी आणि साक्षीच्या मदतीला धावून आली ‘गरज’
Next articleमहिला विश्व : हेल्दी और फिट रहने जरूर खाने चाहिए ये फूड्स
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).