Home हिंदी मदतीचा हात : जान्हवी आणि साक्षीच्या मदतीला धावून आली ‘गरज’

मदतीचा हात : जान्हवी आणि साक्षीच्या मदतीला धावून आली ‘गरज’

869

नागपूर ब्यूरो : जान्हवी बावणे आणि साक्षी बावणे दोन्ही लहान मुली विकट परिस्थितीतुन शिक्षण घेत आहेत. त्यांच्या कुटुंबात आई आणि आजी आहेत. या मुलींच्या वडिलांचा दोन वर्षा आधी कर्करोगामूळे मृत्यू झाला. या बद्दल जेव्हा गरज बहुउद्देशिय कल्याणकारी संस्था नागपूर यांना कळले तर ही संस्था त्यांच्या मदतीला धावून आली.

इथे विडिओ बघा-

गरज बहुउद्देशिय कल्याणकारी संस्था मार्फत त्वरित आणीबाणीच्या स्थितीत या कुटुंबाला आधी घराची भिंत व्यवस्थित करण्यास टाळपत्री उपलब्ध करून देण्यात आली. धान्य किट देण्यात आली आणि दोन्ही मुलींच्या भावी शिक्षणासाठी संपूर्ण शैक्षणीक कार्यवाही करून त्यांचे दाखले विनायकराव देशमुख हायस्कूल मध्ये करण्यात आले. दोन्ही मुलींना आवश्यक संपूर्ण शैक्षणीक सहायता मार्गदर्शनासह प्रदान करण्यात येत आहे.

इथे विडिओ बघा-

यांची मोलाची मदत

अश्या प्रकारे सामाजिक विकास च्या दृष्टिकोणाने संस्थे च्या या कार्यास आर्थिक मदत अभिजित सर आणि अरुण कुमार सर मार्फत करण्यात आली. त्यांचा आईला कुटीर उद्योग सुरू करण्यासाठी संस्थे तर्फे साहित्य घेऊन देण्यात आले. या कार्यास अभिजित सर व खरे सर यांनी आर्थिक मदत केली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).